
कोल्हापूर, १० जून (वार्ता.) – कणेरी येथील सिद्धगिरी रुग्णालयाने जागतिक कीर्तीचे मेंदूरोगतज्ञ डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्या नेतृत्वाखाली जगातील पहिली १७ घंट्यांची मेंदूची अतीदुर्मिळ अतीगुंतागुंताची शस्त्रक्रिया यशस्वी करून वैद्यकीय क्षेत्रात इतिहास रचला. प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेल्या रुग्णालयाने या ऐतिहासिक यशामुळे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. रुग्णसेवा, संशोधन आणि अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान यांचा संगम घडवत संस्थेने आरोग्यसेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे, अशी माहिती मेंदू शल्यविशारद डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१.रुग्णाच्या लहान मेंदूला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्या अस्तित्वात नव्हत्या. वैद्यकीय साहित्य आणि जागतिक संशोधनामध्ये अशा प्रकारच्या रुग्णाची नोंद यापूर्वी कधीही झालेली नसल्याने ही घटना अत्यंत दुर्मिळ आणि अभूतपूर्व मानली जात आहे. मेंदूच्या महत्त्वाच्या भागांचा रक्तपुरवठा कायम राखत रक्तवाहिनीचे सुरक्षित व्यवस्थापन करणे हे अत्यंत मोठे आव्हान होते.
२. सलग १७ घंटे चाललेल्या या शस्त्रक्रियेत मेंदूरोगतज्ञ, मेंदूभूलरोगतज्ञ, तसेच अन्य आधुनिक वैद्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेतले. या ऐतिहासिक शस्त्रक्रियेचा अहवाल आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्याची प्रक्रिया चालू असून भविष्यात ही शस्त्रक्रिया जगभरातील मेंदूशल्यविशारदांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
३. जागतिक कीर्तीचे मेंदू शल्यविशारद डॉ. मरजक्के यांनी यापूर्वी १०० हून अधिक मेंदूंच्या ‘बायपास’ शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. याची नोंद घेत देशातील मेंदूशी संबंधित काम करणार्या एका सर्वाेच्च संस्थेने १३ आणि १४ जून या दिवशी सिद्धगिरी येथे एका विशेष प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !