बिहार पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत पीडितांची नेपाळ सीमेवरून केली सुटका !
(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)

मोतिहारी (बिहार) – बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात असलेल्या मोतिहारी शहरातील मौलवी अशफाक याने मदरशातील अल्पवयीन विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने नेपाळमध्ये त्यांची तस्करी करण्याचाही प्रयत्न केला.
अशफाकला नेपाळच्या सीमेजवळ चौघा पीडितांसह पकडण्यात आले आहे. मुलींना विकून त्याला ५ लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळणार होती.
Motihari (Bihar): Madrasa Maulvi Ashfaq attempts to sexually abuse 4 female students and sell them in Nepal!
Showing prompt action, the police rescued the victims from the Nepal border!
The mainstream media, quick to target and malign Hindu saints and spiritual leaders, often… pic.twitter.com/IPxXwM7C1I
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 10, 2026
१. बिहार पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे ३६ घंट्यांच्या आत या मुलींची सुटका करण्यात आली.
२. पीडितांनी सांगितले की, त्यांना याची कल्पनाही नव्हती की, त्यांना शिकवणारा मौलवीच त्यांची विक्री करेल.
३. मौलवीने पोलीस चौकशीत संपूर्ण योजना आणि नेपाळमधील मानवी तस्करीच्या जाळ्याविषयी माहिती दिली.
४. तो म्हणाला की, वर्ष २०२२ मध्ये तो मौलवी बनण्याचे प्रशिक्षण घेत होता. या काळात त्याने नेपाळला भेट दिली होती. तेथे एका हॉटेलमालकाशी त्याची भेट झाली. मालकाने अशफाकसह योजना आखली. भारतातील मदरशातून अल्पवयीन मुलींना नेपाळमध्ये हॉटेलमालकाला विकण्याची ही योजना होती.
५. अशफाकने शिक्षण पूर्ण करून शिकारगंज पोलीस ठाण्याच्या सीमेतील एका गावातील मदरशात मौलवी बनल्यावर त्याची योजना अमलात आणली.
६. त्याने अनेक विद्यार्थिनींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी झाला. त्याने अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. त्यांचा बुद्धीभेद करण्यातही तो यशस्वी झाला.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !