बोपोडी (पुणे) येथील दर्गा पाडल्याचे प्रकरण

पुणे, १० जून (वार्ता.) – बोपोडी येथील दर्गा पाडल्यानंतर उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी महापालिकेने गुपचूप कारवाई केल्याचा आरोप केला होता. त्यावर स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संताप व्यक्त करत आहेत. या प्रकरणी येथील गोरक्षक आणि मानद पशूकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी म्हणाले की, बोपोडी येथील दर्गा मेट्रो रेल्वेला धोकादायक अशा स्थितीत असल्याने तो पाडण्यासाठी आम्ही प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर बराच कालावधी उलटल्यानंतर हा दर्गा पाडण्यात आला. त्यापूर्वी तिथे बौद्ध विहारही होते. तेही आधी पाडण्यात आले. मग उपमहापौरांचे वक्तव्य आताच का आले ? मुसलमानांचे लांगूलचालन का केले जात आहे ? असा संतप्त प्रश्न केला. श्री. शिवशंकर स्वामी यांनी अशाच प्रकारे शिवाजीनगर पोलीस लाईन मधील मशिदीविषयी तक्रार केली आहे.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर