सोलापूर जिल्हा कायम मनात राहील ! – कुमार आशीर्वाद, माजी जिल्हाधिकारी, सोलापूर

कुमार आशीर्वाद, माजी जिल्हाधिकारी, सोलापूर

सोलापूर – नागपूर येथे स्थानांतर झाले असले, तरी सोलापूर जिल्हा कायम माझ्या मनात राहील, असे उद्गार सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निरोप समारंभात काढले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच नवे जिल्हाधिकारी एस्. कार्तिकेयन् यांचे स्वागत करण्यात आले. आशीर्वाद यांनी सोलापूरमधील ३ वर्षांच्या कार्यकाळात नागरिक, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे विविध विकासकामे पूर्ण करता आल्याचे सांगितले.