पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना टाकले मागे

नवी देहली – अनुमाने ४० वर्षांच्या प्रभावी राजकीय कारकीर्दीनंतर नरेंद्र मोदी निवडून आलेले आणि सर्वाधिक काळ, म्हणजे १२ वर्षे सलगपणे पदभार सांभाळणारे भारताचे पहिले पंतप्रधान बनले आहेत. या निमित्ताने देश-विदेशातील नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या.
12 years of leadership! 🏆
PM Narendra Modi becomes the first elected Prime Minister to reach this milestone, surpassing Jawaharlal Nehru.
World leaders extend their warmest congratulations on this historic milestone. 🤝🌏#NarendraModi #LongestServingElectedPMModi… pic.twitter.com/4dLKZUprLn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 10, 2026
पंतप्रधान मोदी यांनी १० जून या दिवशी पंतप्रधान म्हणून एकूण ४ सहस्र ३९९ दिवस पूर्ण केले. त्यांनी जवाहरलाल नेहरू यांचा ४ सहस्र ३९८ दिवसांचा पंतप्रधानपदी राहिल्याचा विक्रम मोडला. मे २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी जवळपास १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांनी सर्वाधिक काळ, म्हणजे २५ वर्षांहून अधिक सरकारचे प्रमुख राहिल्याचा विक्रम नोंदवला होता.
पंतप्रधान मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. यामध्ये नोटाबंदी, भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० रहित करणे, उरी सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर यांसारख्या निर्णयांचा समावेश आहे. कोरोना महामारी आणि विविध युद्धे यांसारख्या जागतिक आव्हानांच्या काळातही पंतप्रधान मोदी यांनी देशाचे यशस्वी नेतृत्व केले.
जागतिक नेत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव !
१. पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन ! अलीकडच्या काही आठवड्यांत रोममध्ये पुन्हा भेटणे आणि आपल्या राष्ट्रांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने भविष्याचा वेध घेणार्या ‘विशेष धोरणात्मक भागीदारी’चा संयुक्तपणे शुभारंभ करणे, हा एक आनंददायी अनुभव होता. – जॉर्जिया मेलोनी, पंतप्रधान, इटली
२. हा टप्पा केवळ तुमच्या कार्यकाळाचाच नव्हे, तर जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील जनतेने तुमच्या नेतृत्वावर वारंवार दाखवलेल्या विश्वासाचाही पुरावा आहे. तुमच्या दूरदृष्टीने भारताच्या सीमांपलीकडे, विशेषतः श्रीलंकेतही अनेकांना प्रेरणा दिली आहे ! – अनुरा कुमारा दिसानायके, राष्ट्राध्यक्ष, श्रीलंका
३. पंतप्रधान मोदी यांची ही कामगिरी त्यांच्या अनेक वर्षांच्या समर्पित जनसेवेचा आणि भारताचा विकास, समृद्धी अन् जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा उंचावण्यातील त्यांच्या नेतृत्वाचा पुरावा आहे. – अन्वर इब्राहिम, पंतप्रधान, मलेशिया
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी