
सातारा, १० जून (वार्ता.) – सातारा नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने ८ जून या दिवशी राधिका रस्त्यावरील अनधिकृत टपर्या हटवल्या. हटवलेल्या १९ टपर्यांपैकी ७ टपर्या शासनाधीन करण्यात आल्या आहेत. समर्थ मंदिर परिसरातील कारवाईनंतर नगर परिषदेने राधिका रस्त्यावरील कारवाई केली.
नगर परिषदेचे १० कर्मचारी २ जेसीबी आणि आवश्यक यंत्रणेसह अतिक्रमण काढण्यासाठी गेले. कारवाईची माहिती मिळताच काही व्यावसायिकांनी स्वतःहून आपल्या टपर्या हटवण्यास प्रारंभ केला. या वेळी बारटक्के चौक ते महाराणा प्रताप चौक परिसरातील रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत टपर्या हटवण्यात आल्या. दुपारनंतर पोलीस बंदोबस्तात मार्केट यार्ड समोरील परिसरातही अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या वेळी नगर परिषद कर्मचारी आणि दुकानदार यांच्यामध्ये वाद झाले; मात्र पोलिसांच्या उपस्थितीमध्ये कारवाई सुरळीतपणे पार पडली.
वारस नोंदीसाठी ७० सहस्र रुपयांची लाच घेणारा तलाठी कह्यात
सोलापूर जिल्हा कायम मनात राहील ! – कुमार आशीर्वाद, माजी जिल्हाधिकारी, सोलापूर
भिवंडी महापालिकेतील लाचखोर प्रभारी साहाय्यक आयुक्ताला अटक !
मिरज (सांगली) येथे हिंदु युवकावर प्राणघातक आक्रमण करणार्या मतीन काझीसह ६ जणांना पोलिसांकडून अटक !
अधिक महिन्यात इस्कॉन आयोजित भागवत कथा भाविकांची भक्तीभाव वृद्धींगत करणारे – आमदार संग्रामभैय्या जगताप
‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त सातारा येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन