
मुंबई, १० जून (वार्ता.) – श्री सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी, तसेच परिसरातील भक्त आणि नागरिक यांच्या सुविधांसाठी संमत केलेला ५०० कोटी रुपयांचा निधी थेट मुंबई महानगरपालिकेकडे रहाणार आहे. या निधीचा आणि मंदिर न्यासाचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे या निधीमध्ये टक्केवारी खाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सडेतोड स्पष्टीकरण श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. मंदिर न्यासाच्या समिती कक्षात आयोजित केलेल्या विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी मंदिराचा सुशोभीकरण आराखडा, भक्तांसाठी उभारण्यात येणार्या नव्या सुविधा आणि वाढलेले उत्पन्न यांविषयी सविस्तर माहिती दिली.
ते म्हणाले,
१. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात यासाठी मुंबई महानगरपालिकेला ५०० कोटी रुपयांचा निधी आरक्षित करण्याचे निर्देश दिले होते. हा सर्व निधी मुंबई महानगरपालिकेचा असून तो कुठल्याही परिस्थितीत सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाकडे वर्ग केला जाणार नाही.
२. उज्जैनच्या महाकाल मंदिराचा आराखडा सिद्ध केलेल्या आस्थापनानेच सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणाचा आराखडा बनवला आहे. या सर्व कामांच्या निविदा काढणे आणि कार्यादेश देणे हे काम महापालिकाच करील.
३. न्यासाच्या सध्याच्या पारदर्शक कामकाजामुळे मंदिराच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी आठवड्याला दानपेटीत मिळणारे ४० ते ४५ लाख रुपयांचे उत्पन्न आता ९४ ते ९७ लाख रुपयांपर्यंत पोचले आहे. याचे श्रेय मंदिराचे प्रामाणिक विश्वस्त आणि कर्मचारी यांना जाते.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा