नांदेड – ‘भारतीय रिझर्व्ह बँके’ने जारी केलेल्या ५ रुपयांच्या नोटा, तसेच २० रुपयांची नाणी ही पूर्णपणे कायदेशीर चलन असून सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये त्यांचा स्वीकार करणे बंधनकारक आहे. काही ठिकाणी या नोटा आणि नाणी यांचा स्वीकार करण्यास नकार दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक प्रतिष्ठाने, शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, अधिकोष, तसेच सर्वसामान्य नागरिक यांना आवाहन केले आहे की, ५ रुपयांच्या नोटा आणि २० रुपयांची नाणी कोणत्याही शंका किंवा गैरसमजाविना स्वीकारावीत.
अधिकोष, व्यापारी संघटना आणि संबंधित संस्था यांमध्ये याविषयी जनजागृती करावी. नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा गैरसमजांना न फसता कायदेशीर चलनाचा स्वीकार करावा आणि व्यवहार सुरळीत होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !