केकमधील धातूच्या तारा ३ वर्षांच्या मुलाने चॉकलेट समजून खाल्ल्या !

बेकरीचालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत !

सौजन्य instagram

ठाणे – येथील हिरानंदानी इस्टेट परिसरातील ३ वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पालकांनी ‘स्पायडरमॅन’च्या संकल्पनेनुसार सजवलेला केक मागवला होता. बेकरीचालकाने केक बनवतांना त्याच्या नक्षीला आकार देण्यासाठी त्यात धातूच्या तीक्ष्ण तारा वापरल्या होत्या. याविषयी त्याने ग्राहकाला कल्पना दिली नाही. त्यामुळे वाढदिवस साजरा झाल्यावर त्या मुलाने केक खाल्ला. या वेळी त्याला या पिना म्हणजे चॉकलेट असल्याचे वाटून त्याने त्याही खाल्ल्या. हे पालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मुलाला आधुनिक वैद्यांकडे नेले. पडताळणी केल्यावर त्या पिना मुलाच्या आतड्यामध्ये पोचल्याचे लक्षात आले. आधुनिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केल्यावर त्या तारा शौचावाटे मुलाच्या शरिराबाहेर पडल्या. त्यामुळे मुलाचा जीव वाचला.

संपादकीय भूमिका

  • या प्रकरणी बेकरीचालकावर कठोर कारवाई व्हायला हवी ! त्याने धातूच्या पिना वापरल्याविषयी ग्राहकांना कल्पना का दिली नाही ?
  • अशांच्या दुकानावर बंदीच आणायला हवी !
  • पालकांनो, संकल्पनात्मक केक मागवतांना त्यात काही जीवघेणे दडलेले नाही ना, याची निश्चिती करा !