
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत येणार्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. श्री रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यापासून आतापर्यंत १५ कोटींहून अधिक लोकांनी मंदिराला भेट दिली आहे. या कालावधीत देवस्थानाला ५०० कोटी रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या असून यापैकी अंदाजे १५० कोटी रुपये दानपेट्यांमधून, तर उर्वरित ३५० कोटी रुपये ऑनलाइन आणि प्रत्यक्ष जमा झाले आहेत. त्या एका पारदर्शक प्रणालीद्वारे सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या देणग्यांचा वापर मंदिराची देखभाल, सेवा कार्ये आणि भविष्यातील योजना यांच्यासाठी केला जाईल, असे ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’ने स्पष्ट केले.
प्रतिदिन सरासरी ८ ते १० लाख रुपयांची देणग्या !
श्रीराममंदिरात देणगी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ६ मोठ्या दानपेट्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त परिसरातील इतर मंदिरांमध्येही दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. देणग्या स्वीकारण्यासाठी ४ ‘काऊंटर’ही उभारण्यात आले आहेत. तेथे भाविक स्वतःच्या श्रद्धेनुसार रोख देणगी जमा करू शकतात आणि त्वरित संगणकीकृत पावती मिळवू शकतात. ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’कडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीराममंदिरात सध्या प्रतिदिन ८ ते १० लाख रुपयांच्या देणग्या जमा होत आहेत. संपूर्ण देणगी प्रक्रियेवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जाते.
देणगीची रक्कम न्यासाच्या खात्यात जमा होते !
मिळालेल्या माहितीनुसार देणग्यांची मोजणी झाल्यानंतर हा निधी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या खात्यात जमा केला जातो. पैसे मोजण्यासाठी एक विशेष यंत्रणा नेमण्यात आली असून दोन पाळ्यांमध्ये तैनात असलेले कर्मचारी निधीची मोजणी करतात. याव्यतिरिक्त न्यासानेनियुक्त केलेले अधिकारी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारीही साहाय्य करतात. पैसे मोजण्याचे ठिकाण ‘व्हॉइस रेकॉर्डिंग’च्या सुविधेसह आधुनिक सीसीटीव्ही कॅमेर्यांनी सुसज्ज आहे.
वर्षातून दोनदा केले जाते लेखापरीक्षण !
ट्रस्ट ऑनलाइन, धनादेश, यूपीआय आणि दानपेट्या, यांद्वारे मिळालेल्या देणग्यांचे सहामाही लेखापरीक्षणही करते. या कामासाठी सनदी लेखापालांची नेमणूक करण्यात आली असून बँकेचे अंतर्गत कर्मचारी आणि अधिकारी यांचाही यात सहभाग असतो. या लेखापरीक्षणात उत्पन्न आणि खर्चासह प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवला जातो.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक