पोलिसांचा संशयास्पद कारभार !
वरिष्ठांकडून होणार चौकशी !
तक्रार करणार्या हिंदुत्वनिष्ठांना मारहाण, तर घुसखोरांची पाठराखण !

मुंबई – मागील वर्षभरात मुंबईत सहस्रोंच्या संख्येने बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत, तर दुसरीकडे भांडुप (पश्चिम) मधील भट्टीपाडा येथे बांगलादेशी घुसखोरांकडून पैसे घेऊन पोलीस त्यांना अभय देत असल्याचा संतापजनक प्रकार आढळून आल्याचे समजते. याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशी करून ४-५ दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिले आहे.
Shielding Bangladeshi Infiltrators for Money: Is This Not Treason?
Explosive allegations from Mumbai's Bhattipada, Bhandup: Hindutva activists claim police ignored complaints about suspected Bangladeshi infiltrators, assaulted those who raised the issue, and provided protection… pic.twitter.com/AH5bzm1u41
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 9, 2026
१. भट्टीपाडा येथे काही बांगलादेशी घुसखोर फळविक्री आणि मासेविक्री करत असल्याची माहिती स्थानिकांनी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना दिली. ७ जून या दिवशी हिंदुत्वनिष्ठ युवकांनी विक्रेत्यांची ओळखपत्रे पाहिली.
२. नारळपाणी विकणार्या युवकाने हिंदु असल्याचे सांगितले; पण ऑनलाईन माध्यमातून पैसे देतांना तो मुसलमान असल्याचे आढळले. हिंदुत्वनिष्ठांनी आधारकार्ड मागितल्यावर त्याने बांगलादेशातून आल्याचे मान्य केले. (कावेबाज मुसलमान ! – संपादक) यानंतर त्याचा हिंदुत्वनिष्ठांशी वाद झाला. त्याने हिंदुत्वनिष्ठांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला.
३. तेथून पळ काढून तो भांडुप पोलीस ठाण्यात गेला. हिंदुत्वनिष्ठही तेथे पोचले. हिंदुत्वनिष्ठांनी मुसलमान विक्रेते बांगलादेशी घुसखोर असल्याविषयी चौकशी करण्याची मागणी केली; परंतु त्याकडे दुर्लक्ष करून पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांनाच मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेले विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर रात्री उशिरापर्यंत आंदोलन करत पोलिसी कारवाईचा निषेध केला. (हिंदूबहुल राज्यात हिंदुत्वनिष्ठांवर अशी वेळ येणे दुर्दैवी ! – संपादक)
पोलीस बांगलादेशी घुसखोरांकडून पैसे घेत असल्याचा हिंदुत्वनिष्ठांचा आरोप
भट्टीपाडा येथे व्यवसाय करणार्या बांगलादेशी घुसखोरांकडून हप्ते घेऊन पोलीस त्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठांनी केला. पोलीस त्यांच्याकडून हप्ते वसूल करत असल्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ हिंदुत्वनिष्ठांनी दाखवले.
याविषयी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला माहिती देतांना बजरंग दलाचे कोकण प्रांत सहसंयोजक श्री. गौतम रावरिया म्हणाले, ‘‘पोलीस हप्ते घेऊन बांगलादेशी घुसखोरांना अभय देत असल्याची तक्रार पोलीस उपायुक्त अभिनय देशमुख यांच्याकडे केली आहे. याविषयी चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. या प्रकरणी आम्ही मुख्यमंत्री आणि मानवाधिकार आयोग यांच्याकडेही तक्रार करणार आहोत.’’
हे सरकारला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना देशद्रोहाबद्दल कडक शासन करा !
पोलिसांनो, तुमचे कर्तव्य कुठपर्यंत… ?
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ‘हिमनगाचे टोक’ ?
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था