अश्लील भाषेत शिवीगाळ, अयोग्य स्पर्श केला

पुणे – मुसलमानबहुल कोंढवा परिसरात सामाजिक कार्य करणार्या एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी मुसलमान फैयाज युसूफ खान याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. ‘मी इथला मोठा भाई आहे’, असे सांगत आरोपीने महिलेला अश्लील शिवीगाळ करून धमकावले. ‘तिचा पाठलाग केला’, अशी तक्रार पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली.
१. पीडित महिला १८ मे या दिवशी कौसरबाग परिसरात भाजीपाला खरेदीसाठी जात होत्या. रस्त्यात मैत्रिणी भेटल्याने त्या रस्त्याच्या कडेला थांबून बोलत होत्या.
२. आरोपी फैयाज हा दुचाकीवरून त्या ठिकाणी आला. पीडित महिलेला शिवीगाळ केली. या परिसरात ‘मी मोठा प्रभावशाली व्यक्ती (भाई) आहे’, असे सांगत धमकी दिली.
३. आरोपी फैयाजने महिलेकडे अश्लील हावभाव केले. अंगाला अयोग्य स्पर्श करून विनयभंग केला. या प्रकारामुळे इतर महिलाही घाबरल्या. त्या तेथून जाऊ लागल्या. आरोपीने शिवीगाळ करत त्यांचाही पाठलाग केला. या घटनेमुळे महिलांना मोठा मानसिक धक्का बसल्याचेही तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहे.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच