Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण

शेजारील शिकवणी वर्गाच्या संचालकासह ३ जणांना अटक

खान सर

पाटलीपुत्र (बिहार) – येथे २ जूनच्या रात्री प्रसिद्ध खान सर यांच्या ‘ग्लोबल स्टडीज कोचिंग’वर आक्रमण करण्यात आले. या वेळी सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आली. तसेच दगड आणि विटा फेकण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी ‘ज्ञान बिंदु कोचिंग’चे संचालक रोशन आनंद यांच्यासह त्यांचे दोन सहकारी अभिषेक आणि गौरव यांना अटक केली आहे. येथे गोळीबार करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला होता; मात्र तो खोटा निघाला.

खान सर यांच्या शिकवणी वर्गाच्या (कोचिंगच्या) शेजारी ज्ञान बिंदू कोचिंग आहे. ज्ञान बिंदू कोचिंगच्या फलकावर खान सर यांचे भित्तीपत्रक लावण्यात आले होते. यावरून वाद झाला आणि नंतर प्रकरण वाढले.

संपादकीय भूमिका

शिकवणी वर्गाच्या स्पर्धेतून निर्माण झालेली ही गुन्हेगारी वृत्ती विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवत आहे ?