Hanif Sheikh Arrested :  संशयित निदा खान हिला आश्रय देणारा घरमालक हनीफ शेख यास अटक !

  • कॉर्पोरेट (व्यावसायिक) जिहाद’ प्रकरण

  • ‘एम्.आय.एम्.’चा नगरसेवक मतीन पटेल आणि हनीफ शेख यांची ८ घंटे चौकशी !

हनीफ शेख अटक !

नाशिक – येथील राष्ट्रविघातक ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथे छुप्या पद्धतीने आश्रय दिल्याचे उघडकीस आले. ‘विशेष अन्वेषण पथका’ने ‘ए.आय.एम्.आय.एम्.’ (‘ऑल इंडिया मजेलिस ए इत्तेहादुल मुसलीमीन’च्या म्हणजे अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ) पक्षाचा नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हनीफ शेख या दोघांची १ जूनला गुन्हे शाखेच्या कार्यालयात दुसर्‍यांदा ८ घंटे चौकशी केली. अन्वेषणामध्ये घरमालक हनीफ शेख यानेच निदा खानला थारा दिल्याच उघड झाल्याने पोलिसांनी त्याला या गुन्ह्यात सहआरोपी करत त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

चौकशीच्या वेळी हनीफ शेख याने ‘मतीनभाईने माझ्याकडे घराची चावी मागितली होती. त्याने ती कुणाला दिली, हे मला ठाऊक नाही’, असा कांगावा करत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र संशयित निदा खान याच घरात लपून बसली होती. २५ मे या दिवशी झालेल्या १० घंट्यांच्या चौकशीत मतीन पटेल याने बडे सहाबने (मोठ्या साहेबांनी) दूरभाष केल्यामुळे घरात ठेवण्याची व्यवस्था केल्याचे सांगितले होते.

देशद्रोह्याला घरात आश्रय देणे गंभीर गुन्हा !

कोणतीही ओळखपत्रे किंवा पूर्वमाहिती न घेता संशयित देशद्रोह्याला घरात आश्रय दिल्यामुळे घरमालक हनीफ शेख याच्यावर ‘बी.एन्.एस्.२१६’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष अन्वेषण पथक हनीफला समवेत घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे पंचनामा करण्यासाठी गेले आहे. या संवेदनशील प्रकरणातील दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान या संशयितांच्या जामीन आवेदनावर येत्या १२ जूनला सुनावणी होणार असून पथक या प्रकरणाचे पुरवणी दोषारोपपत्र सादर करणार आहे.