
वर्धा येथील विवाह सोहळ्यात ‘फ्री लान्सर’ (मुक्त पत्रकार) म्हणून घुसलेला एक धर्मांध जिहादी हिंदु मुलींची वेगवेगळ्या प्रकारची (‘पोझ’मधील) छायाचित्रे आणि आक्षेपार्ह व्हिडिओ काढत होता. त्यांचे भ्रमणभाष क्रमांक मिळवून पुढे ‘ब्लॅकमेलिंग’च्या (फसवण्याच्या) जाळ्यात ओढण्याचा त्याचा हा कट होता. केवळ एका सजग हिंदु महिलेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि पुढील मोठा अनर्थ टळला. या घटनेने सिद्ध केले आहे की, आता हिंदूंच्या कौटुंबिक आणि आनंदाच्या क्षणांवरही जिहाद्यांचे कुटील डोळे रोखले गेले आहेत ! हे एका अत्यंत सुनियोजित आणि छुप्या षड्यंत्राचे नवीन रूप आहे. लव्ह जिहाद विविध मार्गांनी अवलंबला जात असल्याचे लक्षात येते. व्यावसायिक जिहादाप्रमाणेच छायाचित्र काढण्याच्या बहाण्यातून हिंदु मुलींपर्यंत पोचून त्यांना फसवण्याचे षड्यंत्र हिंदूंना आतापर्यंत लक्षात आलेले नाही. मुली आणि पालक सतर्क नसल्याचाच हा परिणाम आहे. कुठलाही व्यावसायिक असला, तरी तो ‘जिहादी’ नाही ना ? हे पारखून पहाणे आवश्यक आहे. लग्नासारख्या सोहळ्यात ते येतात आणि मुलींचे असे धिंडवडे काढतात, हे लज्जास्पद आहे. हिंदु मुलींच्या पालकांनी त्यांना सजग केलेले नाही, त्याचाच हा परिणाम आहे. पालकच याविषयी सजग नाहीत. त्यामुळे हिंदूंनी किती स्तरापर्यंत सतर्क रहाणे आवश्यक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

भूमी जिहाद, थुंकी जिहाद त्याचप्रमाणे समाजमाध्यमे, ऑनलाईन खेळांचे ॲप आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून हिंदु तरुण-तरुणींचा पद्धतशीरपणे बुद्धीभेद करून त्यांना स्वधर्मापासून विन्मुख करणारा ‘सायबर जिहाद’, हिंदु तरुणांना व्यसनाधीनतेच्या खाईत लोटणारा ‘अमली पदार्थ जिहाद’, वक्फ कायद्यासारख्या कायदेशीर पळवाटांचा अपलाभ घेऊन हिंदूंच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक मालमत्तांवर दावे ठोकणारे कायदेशीर षड्यंत्र आणि खाद्यपदार्थांपासून औषधोपचारांपर्यंत ‘हलाल प्रमाणपत्रा’ची सक्ती करून समांतर धार्मिक अर्थव्यवस्था उभी करत स्थानिक हिंदु व्यापार्यांना स्पर्धेतून बाहेर फेकणारे ‘हलाल अर्थव्यवस्थे’चे छुपे संकट ही हिंदूंवरील आक्रमणाची अत्यंत घातक रूपे आहेत. यांच्यामुळे हिंदूंच्या सांस्कृतिक अस्मितेवर आणि आर्थिक नाड्यांवर थेट घाला घातला जात असल्याने आता प्रत्येक पातळीवर हिंदूने डोळ्यांत तेल घालून अखंड जागृत रहाणे अनिवार्य झाले आहे. जोपर्यंत आपल्या मनात स्वधर्माविषयी प्रखर अभिमान होत नाही, तोपर्यंत आपण या छुप्या आक्रमणांना रोखू शकत नाही. यासाठी नियमबद्ध धर्माचरण करणे आवश्यक आहे. धर्माभिमानाने संघटित समाजच या जिहाद्यांना चोख उत्तर देण्याची शक्ती निर्माण करील !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !