‘सनातन संस्था’ ही अध्यात्माचा वैज्ञानिक भाषेत प्रसार करणारी संस्था आहे. सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसाराच्या निमित्त विविध ठिकाणी प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने आयोजित केली जातात.
गोवा पुस्तक महोत्सव

१. प्रवचने
आनंदी, तणावरहित आणि व्यसनमुक्त जीवन जगणे, युवकांना व्यक्तीमत्त्व विकास साध्य करता येणे, तसेच विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासात एकाग्रता प्राप्त करणे, इत्यादींसाठी अध्यात्म आणि साधना यांचे महत्त्व आहे. सध्याची युद्धजन्य स्थिती आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये निर्माण झालेली सामाजिक अस्थिरता, यांमुळे जगभरात चिंतेचे आणि निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. अशा संकटकालीन स्थितीत ‘साधना’ ही व्यक्तीला मानसिकदृष्ट्या स्थिर ठेवणारी आणि तिचे आत्मबळ वाढवणारी गुरुकिल्ली आहे. यासाठी सनातन संस्थेच्या वतीने समाजातील विविध घटकांसाठी प्रवचने आयोजित केली जातात.

१ अ. समाजातील विविध घटकांसाठी आयोजित करण्यात येणारी प्रवचने : शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला वर्ग, शासकीय कर्मचारी, कॉर्पोरेट आस्थापनांत नोकरी करणार्या व्यक्ती, विविध क्षेत्रांतील व्यावसायिक, उद्योजक, अधिवक्ते, तसेच तणावयुक्त जीवन असलेली पोलीस दले आणि सेना दले इत्यादी.
१ आ. विविध विषयांवर करण्यात येणारी प्रवचने
१ आ १. आनंदी जीवनासाठी अध्यात्म : आपण प्रतिदिन प्रत्येक कृती आनंद मिळण्यासाठी करत असतो; पण ‘खरा आनंद कसा मिळवायचा’, यासाठी साधनेचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या प्रवचनातून केले जाते.
१ आ २. तणावमुक्तीसाठी अध्यात्म : आजच्या स्पर्धेच्या युगात अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारच्या ताणाखाली असतो. काही वेळा हा ताण सहन न होऊन अनेक जणांनी टोकाचे, म्हणजे आत्महत्येचे पाऊल उचलल्याविषयी आपण ऐकतो. ‘अशी परिस्थिती आणि प्रसंग, यांमुळे वाढणारा तणाव नियंत्रित करण्यासाठी स्वयंसूचना देणे आणि आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करणे’, यांविषयी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या प्रवचनांतून शिकवले जाते.
१ आ ३. व्यसनमुक्तीसाठी साधना : सध्या समाजात व्यसनाधीनता पुष्कळ वाढली आहे. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तींची कौटुंबिक, व्यावहारिक आणि सामाजिक या स्तरांवर मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी ‘साधना’ हे एक प्रभावी माध्यम असून त्याविषयी ‘व्यसनमुक्तीसाठी साधना’ या प्रवचनांतून मार्गदर्शन केले जाते.
१ आ ४. व्यक्तीमत्त्व विकासासाठी साधना : आजच्या युवा वर्गाचा प्रभावी व्यक्तीमत्त्व निर्माण करण्याकडे कल असतो. ‘चांगले दिसणे, चांगली वेशभूषा करणे किंवा संवादकौशल्य आत्मसात करणे’, म्हणजे ‘व्यक्तीमत्त्व विकास’, अशी सध्याच्या युवा पिढीची धारणा आहे. प्रत्यक्षात ही संकल्पना अत्यंत वरवरची आणि उथळ आहे. आपले व्यक्तीमत्त्व प्रभावी होण्यासाठी ‘आपल्या स्वभावातील दोष, जे आपले व्यक्तीमत्त्व आदर्श होण्यात अडथळा ठरतात, असे मूळ स्वभावदोष ओळखणे आणि त्यांचे निर्मूलन करून आपल्यातील सद्गुणांची वृद्धी करणे’, हे आवश्यक असते. त्यासाठी राबवायची ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् साधनेचे प्रयत्न’ यांविषयी ‘व्यक्तीमत्त्व विकासासाठी साधना’ या प्रवचनांतून मार्गदर्शन केले जाते.
१ आ ५. सण आणि उत्सव यांनिमित्त प्रवचने : व्यक्तीने धर्मशास्त्र समजून घेऊन त्यानुसार सण आणि उत्सव साजरे केल्यास तिला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. धर्मशास्त्रानुसार आदर्श पद्धतीने सण आणि उत्सव कसे साजरे करावे, त्याचा त्या जिवाला मिळणारा लाभ इत्यादींविषयी या प्रवचनांतून मार्गदर्शन केले जाते. मकरसंक्रांत, अक्षय्य तृतीया, महाशिवरात्र, रामनवमी, हनुमान जयंती, दत्तजयंती, दसरा, दिवाळी आदी सण, तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, होलिकोत्सव आदी उत्सवांच्या वेळी ही प्रासंगिक प्रवचने आयोजित केली जातात.
जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या विविध विषयांवरील प्रवचनांना मिळालेला प्रतिसाद पुढीलप्रमाणे आहे.

१ इ. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत झालेली प्रवचन

१ ई. या प्रवचनांत उपस्थित असलेल्या जिज्ञासूंपैकी ९१५ जिज्ञासू संस्थेच्या विविध उपक्रमांत सहभागी झाले. या १ सहस्र ३२६ प्रवचनांना उपस्थित राहिलेल्या व्यक्तींनी सनातन संस्थेचे पुढील सत्संग आणि वर्ग त्यांच्या क्षेत्रात घेण्याची मागणी केली.

१ ई १. साधना सत्संग : ‘८३ ठिकाणी साधना सत्संग चालू करावेत’, असे सांगण्यात आले.
१ ई २. बालसंस्कार वर्ग : ‘४२ ठिकाणी बालसंस्कार वर्ग चालू करावेत’, असे सांगण्यात आले.
१ ई ३. युवा साधना सत्संग : ‘९ ठिकाणी युवा साधना सत्संग चालू करावेत’, असे सांगण्यात आले..
या प्रवचनांच्या माध्यमातून समाजातील अनेक जिज्ञासू व्यक्तींनी साधनेला आरंभ केला आहे आणि त्या व्यक्ती आनंदमय अन् तणावमुक्त जीवनाकडे वाटचाल करत आहेत.
२. ग्रंथप्रदर्शने
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी ‘अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, संस्कृतीचे आचरण, आध्यात्मिक उपाय, ईश्वरप्राप्तीसाठी कला, तसेच राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, हिंदु राष्ट्र, आपत्कालीन उपचार’ यांसारख्या विविधांगी विषयांवरील ग्रंथांचे संकलन केले आहे. एप्रिल २०२६ पर्यंत सनातन संस्थेने ३७० ग्रंथांच्या १३ भाषांमध्ये १ कोटी २ लाख ४६ सहस्र प्रती प्रकाशित केल्या आहेत.
२ अ. प्रतिदिन, साप्ताहिक किंवा महिन्यातून एकदा, तसेच प्रतिवर्षी आणि राज्य स्तरावर अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर लावण्यात येणारी ग्रंथप्रदर्शने : भारतभरात विविध ठिकाणी सनातनच्या ग्रंथांची प्रदर्शने नियमितपणे लावली जातात. अनेक ठिकाणी ग्रंथप्रदर्शन प्रतिदिन, साप्ताहिक किंवा मासातून एकदा लावले जाते. त्याचप्रमाणे प्रतिवर्षी देहली, आंध्रप्रदेश, तमिळनाडू इत्यादी राज्यांत होणार्या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यांतही (World Book Fair) मध्येही सनातन ग्रंथांच्या प्रदर्शनातून या ज्ञानशक्तीचा प्रसार केला जातो.
२ आ. अध्यात्मशास्त्राच्या प्रचारासाठी समाजात पुढील निमित्ताने ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन केले जाते.
१. मंदिरातील सण, उत्सव किंवा यात्रा
२. विवाह, मुंज, वाढदिवस यांसारखे कौटुंबिक कार्यक्रम.
३. राष्ट्र-धर्म यांच्याशी संबंधित उपक्रम.
४. कीर्तन, प्रवचन, व्याख्यान किंवा सभा
५. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यक्रम इत्यादी
२ इ. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शनांना मिळालेला प्रतिसाद पुढीलप्रमाणे आहे.
जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत आयोजित ग्रंथप्रदर्शने

२ ई. ग्रंथप्रदर्शनांना भेट देणारे मान्यवर : विविध राज्यांत लावलेल्या ग्रंथप्रदर्शनांना गोव्याचे राज्यपाल पशुपती अशोक गजपती राजू, खासदार बांसुरी स्वराज, माजी खासदार श्री. अनिल बोंडे, गोव्याचे पर्यटनमंत्री श्री. रोहन खंवटे, माजी मंत्री श्री. गोविंद गावडे, आमदार श्री. सुधीर गाडगीळ, आमदार सौ. शशिकला जोल्ले, आमदार श्री. दीपक केसरकर, आमदार सौ. मंदा म्हात्रे, मुंबईचे पालकमंत्री श्री. आशिष शेलार, आचार्य अनिरुद्धाचार्य, आचार्य पवन त्रिपाठी इत्यादींसह विविध लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी भेट दिली.
जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांच्या माध्यमातून सहस्रो जिज्ञासू सनातन संस्थेच्या कार्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांनी साधनेला आरंभ केला आहे.
आगामी काळात आपल्यालाही आपल्या क्षेत्रात सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणारी प्रवचने किंवा ग्रंथप्रदर्शने आयोजित करायची असल्यास कृपया ७०५८८८५६१० या क्रमांकावर संपर्क करावा.
‘जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या कृपेने सनातन संस्थेच्या कार्याला समाजातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’
– अश्विनी अनंत कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०२६)
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !