डेन्मार्कच्या पंतप्रधानांचे विधान

कोपनहेगन (डेन्मार्क) – जर आज माझी लहान मुले असती, तर त्यांना सामाजिक माध्यमांवर एकटे सोडण्यापेक्षा सिगारेट पिऊ देणे मला अधिक पसंत पडले असते, असे विधान डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी केले.
डिजिटल युगात मुलांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करतांना पंतप्रधान मेटे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत म्हटले की, आपल्या व्यवस्थेत काहीतरी गंभीर चूक आहे. आपण आजही जुन्या धोक्यांकडेच लक्ष देत आहोत, तर त्यापेक्षा मोठा आणि भयावह धोका आपल्यासमोर उभा राहिला आहे.
आम्ही मुलांचे बालपण माहिती तंत्रज्ञान आस्थापनांच्या भरवशावर सोडले !
पंतप्रधानांनी या सूत्रावर इतकी कठोर भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी संसदेच्या उद्घाटन सत्रात त्यांनी म्हटले होते की, आम्ही आतापर्यंत खूपच भोळे राहिलो आहोत. आम्ही आमच्या मुलांचे डिजिटल आयुष्य अशा माहिती तंत्रज्ञान आस्थापनांच्या हवाली केले आहे, ज्यांनी कधीही मुलांच्या हिताचा विचार केलेला नाही. भ्रमणभाष संच आणि सामाजिक माध्यमे आमच्या मुलांचे बालपण हिरावून घेत आहेत. आता आपल्याला या डिजिटल कारागृहातून बाहेर पडून पुन्हा एकदा वास्तविक समाजाकडे वळण्याची आवश्यकता आहे.
१५ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमे थेट वापरण्यावर बंदी घालणार !
डेन्मार्क सरकार अशा प्रस्तावावर काम करत आहे, ज्यानुसार १५ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या थेट वापरावर बंदी येईल. नवीन नियमांनुसार १३-१४ वर्षांची मुले केवळ पालकांच्या लेखी किंवा डिजिटल अनुमतीनंतरच सामाजिक माध्यमांचा वापर करू शकतील. हा कडक नियम पुढील वर्षापासून लागू केला जाऊ शकतो.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !