भीषण महायुद्ध काळ
श्री. शशी यांना ‘भीषण महायुद्धाच्या काळात होणारा अन्नधान्य अन् औषधे यांचा तुटवडा, पाणीटंचाई, वीज नसणे इत्यादी बिकट परिस्थितीमुळे मी सुरक्षित रहाणे कठीण आहे’, अशी भीती वाटते.
स्वयंसूचना : ज्या वेळी माझ्या मनात ‘महायुद्धाच्या काळात होणारा अन्नधान्य अन् औषधे यांचा तुटवडा, पाणीटंचाई, वीजपुरवठा नसणे इत्यादी परिस्थितीमुळे मी सुरक्षित राहीन का ?’, असे विचार येतील, त्या वेळी ‘महायुद्धाच्या काळात आवश्यक असणारे अन्नधान्य, औषधे इत्यादी मी साठवून ठेवत आहे. विजेसाठी सौरऊर्जा यंत्रणा, पाण्यासाठी टाक्या इत्यादी पूर्वसिद्धताही मी करत आहे’, याची मला जाणीव होईल. ‘मी साधना करत असल्यामुळे देवही माझ्या पाठीशी आहेच’, हे लक्षात घेऊन मी साधनेचे प्रयत्न अजून वाढवीन.
पूर
सौ. सारिका यांना भीती वाटते, ‘गावाजवळून वहाणार्या नदीला पूर येईल आणि माझे अन् माझ्या कुटुंबियांचे प्राण संकटात येतील.’
स्वयंसूचना : ज्या वेळी माझ्या मनात ‘पुढील पावसाळ्यात नदीला पूर येईल आणि माझे अन् माझ्या कुटुंबियांचे प्राण संकटात येतील’, असे भीतीचे विचार येतील, त्या वेळी ‘अन्न, औषधे इत्यादींचा पुरेसा साठा मी घरात आधीच करून ठेवलेला आहे. पुरामध्ये सुरक्षित रहाण्यासाठी करायच्या आपत्कालीन उपाययोजना मी आधीच समजून घेतलेल्या आहेत. देवही माझ्या पाठीशी आहे. यामुळे मी पुराच्या संकटाला खंबीरपणे तोंड देऊ शकते’, याची मला जाणीव होईल अन् मी शांतपणे नामजप करत माझी कामे करीन.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सिद्धता करा !)

साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !