श्रीभूमी (आसाम) येथे मंदिराच्या दानपेटीवर गायीचे कापलेले डोके सापडले !

श्रीभूमी (आसाम) – श्रीभूमी जिल्ह्यातील मदनपूर गावातील एका मंदिरातील दानपेटीवर गायीचे कापलेले डोके आढळल्याने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. पोलिसांनी दानपेटीवरून गायीचे डोके आणि तिथे पसरवलेला इतर कचरा हटवला. काही लोकांनी जंगली प्राण्याने डोके आणल्याची शक्यता वर्तवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला; परंतु स्थानिक जनतेने ही शक्यता फेटाळून लावली. सध्या संपूर्ण मदनपूर गावात परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण; पण नियंत्रणात आहे. मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

(म्हणे) ‘अशी घटना अजिबात खपवून घेतली जाणार नाही !’ – हिंदु संघटना

(‘खपवून घेतले जाणार नाही’, म्हणजे ते काय करणार आहेत ? हिंदु संघटनांकडून अपेक्षित असा दबाव येत नसल्याने आणि त्यांना सर्व सरकारे गांभीर्याने घेत नसल्याने हिंदूंवरील अत्याचार भारतात चालूच आहे, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक)

या घटनेनंतर स्थानिक हिंदु संघटना आणि नेते यांचा संताप अनावर झाला. हिंदूबहुल भागात अशा प्रकारे गोहत्या करून डोके मंदिरात टाकणे, हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे हिंदु नेत्यांनी स्पष्ट केले. हे बहुसंख्य समाजाला दिलेले आव्हान आहे. दोषींना त्वरित शोधून काढावे आणि त्यांना अशी शिक्षा द्यावी, जी एक उदाहरण बनेल, अशी त्यांनी मागणी केली.

संपादकीय भूमिका

आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !