
वाशी – दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलेली वाशी-तुर्भे लिंक रोड पुलाची ठाणेकडील मार्गिका दीड वर्षानंतर चालू करण्यात आली आहे. याविषयी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. १२ कोटी रुपयांहून अधिक रक्कम या कामासाठी खर्च करण्यात आली आहे. एन्.एम्.एम्.टी. तुर्भे डेपो समोर वाशी-तुर्भे मार्गाला जोडणारा उड्डाणपूल सिडकोने बांधला आहे. सध्या तो महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
येथील उड्डाणपुलाचा एक भाग सुटलेल्या अवस्थेत असल्याचे पालिकेला जून २०२४ मध्ये लक्षात आले. संरचना सल्लागारांनी पहाणी करून त्याच्या दुरुस्तीचा अहवाल दिला होता. दुरुस्ती होईपर्यंत तेथील वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आली होती. दुरुस्तीसाठी विलंब झाल्याने प्रवाशांना वेगळ्या मार्गांनी ये-जा करावी लागत होती.
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !