
कोल्हापूर, २९ मे (वार्ता.) – महाराष्ट्राची ओळख असलेल्या ‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) दूध संघाने ‘हलाल’ प्रमाणपत्र घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. हे हलाल प्रमाणपत्र तात्काळ रहित न केल्यास उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासह तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, तसेच वेळ आली, तर थेट ‘गोकुळ’वर भव्य मोर्चा काढण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दिली आहे. या मागणीचे सविस्तर निवेदन संघटनांच्या प्रतिनिधींनी कोल्हापूरचे ‘गोकुळ’चे प्रशासकीय मंडळ, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि ‘जनसुराज्य शक्ती पक्षा’चे आमदार अशोक माने यांना दिले.
एका धर्मनिरपेक्ष देशात शासकीय प्रमाणपत्रांना डावलून घेतलेल्या या निर्णयामुळे बहुसंख्य हिंदु ग्राहकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून प्रशासनाने याची तातडीने नोंद घेऊन हे प्रमाणपत्र रहित करावे, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘गोकुळ’च्या हलाल प्रमाणपत्राची प्रत जाळली.
संपूर्ण भारतात गोकुळ दूध पोचले नसतांना केवळ मुसलमान देशांनाच उत्पादने विकण्याची घाई का ?
आखाती देशांमध्ये उत्पादने निर्यात करण्यासाठी या प्रमाणपत्राची सक्ती असल्याचे कारण गोकुळ प्रशासनाकडून दिले जात असले, तरी हा अट्टाहास पूर्णतः अनाकलनीय आहे. देशांतर्गत आणि राज्यातच गोकुळच्या दुधाला मोठी मागणी असतांना, तसेच अद्याप संपूर्ण भारतात गोकुलचे दूध पोचले नसतांना केवळ मुसलमान देशांनाच उत्पादने विकण्याची घाई का केली जात आहे ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारचे ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ (एफ्.एस्.एस्.ए.आय.) तसेच ‘अन्न व औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) यांसारख्या अधिकृत शासकीय संस्था अस्तित्वात असतांना वेगळ्या धर्माधारित प्रमाणपत्राची आवश्यकताच काय ? हा देशाची धर्मनिरपेक्ष राज्यघटना आणि शासकीय संस्था यांचा अवमान आहे. हलाल प्रमाणपत्र हे अवैध असल्यामुळे उत्तरप्रदेशात त्यावर बंदी घातलेली आहे.

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून देशात एक अत्यंत घातक आणि समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे, हे प्रमाणपत्र देणारी ‘जमियत उलेमा हिंद’ ही संस्था यातून मिळणार्या पैशांचा वापर जिहादी आतंकवाद्यांचे खटले लढण्यासाठी करते. त्यामुळे गोकुळचे दूध पिणार्या हिंदु ग्राहकांचा कष्टाचा पैसा अप्रत्यक्षरित्या देशविघातक कारवाया आणि आतंकवाद्यांची सुटका यांसाठी वापरला जाणार का ? जर हे दूध ‘हलाल’ प्रमाणित असेल, तर त्यासाठी बहुसंख्य हिंदूंनी स्वत:चा पैसा का मोजावा ? या राष्ट्रीय धोक्याची गांभीर्याने नोंद घेत हे प्रमाणपत्र तात्काळ रहित करावे आणि ज्या तत्कालीन अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या काळात हा निर्णय झाला त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !
या गंभीर विषयावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी कोल्हापुरातील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. या वेळी या शिष्टमंडळात ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रमसिंह जरग, सामाजिक कार्यकर्ते श्री. शशी बीडकर, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, बजरंग दलाचे श्री. प्रतिक कुलकर्णी, ‘हिंदु एकता आंदोलना’चे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि सौ. साधना गोडसे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे आणि श्री. किरण कुलकर्णी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, शहराध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, श्री. श्रीकांत जाधव, ‘पॉझिटिव्ह वॉच’चे श्री. शेखर धोंगडे, मानवाधिकार संघटनेचे श्री. राजेश वाघमारे, हिंदुत्वनिष्ठ श्री. सुयोग काकतकर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. बाबासाहेब भोपळे आदी मान्यवरांनी एकत्र येत ही प्रखर भूमिका मांडली.
प्रशासकीय मंडळाच्या आगामी बैठकीत सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेऊ ! – ‘गोकुळ’च्या प्रशासकांचे आश्वासनया वेळी गोकुळच्या प्रशासकांनी ‘या संपूर्ण प्रकरणावर प्रशासकीय मंडळाच्या आगामी बैठकीत सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेऊ’, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. |
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू