Ulwe Raigad Bulldozer Action : उलवे (जिल्हा रायगड) येथील अवैध मशीद प्रशासनाने पाडली !

मशीद पाडल्यावर उपस्थितांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा !

सेक्टर १९ मधील सरकारी भूखंडावर असलेल्या अवैध मशिदीवर सिडको प्रशासनाची कारवाई

उलवे (जिल्हा रायगड) – येथील सेक्टर १९ मधील सरकारी भूखंडावर असलेल्या अवैध मशिदीवर सिडको प्रशासनाने कारवाई करत ती पाडली. २७ मेच्या रात्री प्रशासनाने धडक कारवाई करत संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त केले.

मुंबई उच्च न्यायालयाने अतिक्रमणधारकांची याचिका फेटाळल्यानंतर ते कायदेशीर पळवाटा शोधण्याचे प्रयत्न करत होते. तत्पूर्वीच सिडको प्रशासनाने वरील कारवाई केली.

बुलडोझरद्वारे कारवाई झाल्यावर उपस्थितांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत परिसरात आनंदोत्सव साजरा केला. ‘हा सत्याचा विजय आहे’, अशी भावना या वेळी सहभागींनी व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

  • अवैध मशिदी उभारल्याच जाऊ नयेत, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत !
  • सरकारी भूखंडांवर अतिक्रमणे करण्याचे धाडस व्हायला नको, असा धाक निर्माण व्हायला हवा !