
छत्रपती संभाजीनगर – नुकताच उल्कानगरी मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. सनातनचे चांगले कार्य केल्याविषयी सनातनच्या साधिका सौ. ऋचा अशोक वर्मा यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन करून भारतमाता, भगवान बसवेश्वर आणि भगवान परशुराम यांच्या पूजनाने करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे श्री. बंगाळे यांनी हिंदु धर्माविषयी मार्गदर्शन करत मुलांवर योग्य संस्कार करण्याचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमाला उल्कानगरी प्रभागातील चारही नगरसेवक उपस्थित होते. या प्रसंगी सौ. ऋचा अशोक वर्मा यांनी सनातन संस्थेच्या कार्याची माहिती देत संस्था सामाजिक कार्य, राष्ट्र आणि धर्मप्रसारासाठी कशा प्रकारे कार्यरत आहे, हे सांगितले. या सत्काराचे श्रेय त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना अर्पण केले. गुरुकृपेमुळेच साधकांना ही सेवा करता येत असल्याची कृतज्ञताही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
जपमाळ
सनातन संस्थेचे साधक त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे यांना ‘समाजभान २०२६’ पुरस्कार !
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
सुख-दु:खाच्या जीवनात आनंदप्राप्तीचे सत्य !