एकाला अटक

पणजी – बनावट ‘शेअर ट्रेडिंग ॲप’द्वारे (समभाग व्यापार ॲपद्वारे) मडगावच्या रहिवाशाची २ कोटी ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील ठाणे येथील २५ वर्षांच्या तरुणाला गोवा सायबर गुन्हे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख मयूर वाघे (नालासोपारा, वसई, ठाणे) अशी पटवली आहे. या प्रकरणी ८ मे या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी ‘एंजल वन’ ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे प्रतिनिधी असल्याचे भासवून अनेक व्हॉट्सॲप क्रमांकांवरून तक्रारदाराशी संपर्क साधला आणि समभाग बाजारात अधिक परतावा देण्याचे आमीष दाखवून ‘ट्रेंडलिटिक’ नावाच्या बनावट ॲपद्वारे गुंतवणूक करण्यास त्याला प्रवृत्त केले. तक्रारदाराने एकूण २ कोटी ९ लाख ७८ सहस्र ६१२ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले होते.
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे