
नाशिक – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील ३ वरिष्ठ कारागृह अधिकार्यांनी एका आरोपीसमवेत कारागृहाच्या अधिकारी निवासस्थान परिसरात मद्याची मेजवानी केली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. आरोपीवर गंभीर फसवणुकीचे गुन्हे आहेत. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कारागृह अधिकारी हिरालाल भामरे, जगदीश ढुमणे आणि अशोक मलवाड यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.
Notice issued to 3 officers for allegedly partying with alcohol alongside an accused inside the Nashik Road Prison residential area
When those entrusted with upholding the law openly fraternize with accused persons, it becomes a serious threat to internal security and law &… pic.twitter.com/MMjnXe2All
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 27, 2026
तिघांनाही ७ दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तिन्ही अधिकारी वर्ष २०१४ पासून कारागृहात कार्यरत आहेत. आरोपीचे नाव गौरव मिश्रा असून त्याच्यावर वर्ष २०२४ मध्ये नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली होती.
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !