
व्हॅटिकन सिटी – कॅथोलिक चर्चच्या इतिहासातील एका गडद अध्यायाचा स्वीकार करत पोप लिओ यांनी चर्चच्या गुलामगिरीच्या वारशाबद्दल औपचारिकपणे क्षमा मागितली आहे. त्यांनी याला ‘ख्रिश्चन स्मृतीतील एक खोल जखम’ असे संबोधले आहे.
𝗖𝗵𝘂𝗿𝗰𝗵’𝘀 𝗗𝗮𝗿𝗸 𝗣𝗮𝘀𝘁 𝗔𝗰𝗸𝗻𝗼𝘄𝗹𝗲𝗱𝗴𝗲𝗱 – 𝗪𝗵𝗮𝘁 𝗔𝗯𝗼𝘂𝘁 𝗙𝗼𝗿𝗰𝗲𝗱 𝗖𝗼𝗻𝘃𝗲𝗿𝘀𝗶𝗼𝗻𝘀 𝗧𝗼𝗱𝗮𝘆?
Pope Leo has apologised for the Catholic Church’s role in slavery, where millions of Africans were forcibly taken to the Americas and other… pic.twitter.com/tVpbMNQlKK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 26, 2026
एका महत्त्वाच्या भाषणात पोप यांनी मान्य केले की,
शतकानुशतके चर्चमधील काही व्यक्ती आणि संस्था यांनी मानवी प्रतिष्ठेच्या विरुद्ध असलेल्या गुलामगिरीच्या व्यवस्थेला केवळ मूक संमतीच दिली नाही, तर काही प्रसंगी तिचे समर्थनही केले. या कृती ‘अमानवीय’ आणि ‘ख्रिश्चन शिकवणुकीच्या पूर्णपणे विरोधात’ आहेत.
पोप लिओ म्हणाले की, ‘आम्ही देवासमोर आणि ज्यांच्या पूर्वजांना या अन्यायाचा फटका बसला, अशा लोकांच्या समोर ही स्वीकृती देतो की, चर्चच्या इतिहासातील या काळाने मानवतेला कलंकित केले आहे. ख्रिश्चन विश्वासाचा मूळ आधार असलेल्या बंधुत्वाच्या आणि समानतेच्या शिकवणुकीला एक मोठा तडा गेला.
चुकांसाठी प्रायश्चित्त घ्यायचे आहे !
चर्चला भूतकाळातील चुकांचे प्रायश्चित्त करायचे आहे आणि भविष्यात अधिक न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करायचे आहेत, असे पोप यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, केवळ क्षमा मागणे पुरेसे नाही, तर आपल्याला या इतिहासातून धडा घेऊन सध्याच्या काळात अस्तित्वात असलेल्या आधुनिक गुलामगिरीच्या रूपांविरुद्ध लढा द्यावा लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.
लाखो आफ्रिकी लोकांना बळजबरीने गुलाम बनवून अमेरिकेसह इतर खंडांत नेण्यात आले होते !
पोप यांनी त्यांच्या भाषणात विशेषतः अटलांटिक गुलामगिरी व्यापाराचा उल्लेख केला, ज्यामध्ये लाखो आफ्रिकी लोकांना बळजबरीने गुलाम बनवून अमेरिकेसह इतर खंडांत नेण्यात आले होते. चर्चने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याऐवजी अनेकदा शांत रहाणे पसंत केले, ही चूक असल्याचे त्यांनी मान्य केले.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman