पत्रकार परिषदेत माहिती देणारी महिला पोलीस महानिरीक्षक हसत असल्याने संताप

कोईम्बतूर (तमिळनाडू) – येथील सुलूर परिसरात एका १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. घराजवळ किराणा सामान आणण्यासाठी गेलेली मुलगी गावाबाहेरील तलावाजवळ मृतावस्थेत सापडली. या घटनेवर मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनीही प्रतिक्रिया देत ही घटना दुःखद असल्याचे म्हटले. या प्रकरणाशी संबंधित दोघांना अटक करण्यात आली आहे. ‘दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे त्यांनी सांगितले.
याविषयी पत्रकार परिषद घेऊन कोईम्बतूर पश्चिम विभागाच्या पोलीस महानिरीक्षक आर्.व्ही. रम्या भारती यांनी माहिती दिली. अशा गंभीर घटनेविषयी पत्रकार परिषद घेणार्या या महिला पोलीस अधिकार्याने एखाद्या आनंदोत्सवाच्या कार्यक्रमाला आल्यासारखे हसत वेळ घालवला. रम्या भारती यांचे हे वर्तन चित्रीत होऊन प्रसारित झाल्यानंतर ‘अशा अकार्यक्षम अधिकार्याला कामावरून बडतर्फ करा’, अशी मागणी संतप्त लोकांनी केली आहे.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin