
अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे बंदुकीचा धाक दाखवून महिलांना लुटणारे २ कुख्यात गुंड मुबीन आणि रजा महंमद नुकतेच पोलीस चकमकीत ठार झाले. अलीगडच्या अतरौलीमध्ये झालेल्या या चकमकीत २ पोलीस शिपाई घायाळ झाले. मुबीन बुलंदशहरचा रहिवासी होता. त्याच्या विरोधात ‘गँगस्टर ॲक्ट’सह लुटमारीचे २८ गुन्हे प्रविष्ट होते, तर रजा महंमद हा हापुडचा रहिवासी होता. त्याच्यावर ४० गुन्हे नोंदवलेले होते. या दोघांवर प्रत्येकी २५ सहस्र रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे अत्यंत चलाखीने गुन्हे करत असत. ते दुसर्या जिल्ह्यात जाऊन चोरी आणि महिलांना लुटण्याचे काम करायचे. त्यानंतर आपापल्या भागात येऊन एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे रहायचे.
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !