दिव्य शंखनाद !

दैवी सोहळ्याचा शुभारंभ सनातनचे पुरोहित श्री. अमर जोशी यांनी केलेल्या शंखनादाने !
यज्ञ निर्विघ्न पार पडण्यासाठी महागणपति पूजन आणि यज्ञ पुण्यकारक होण्यासाठी केले पुण्याहवाचन !
श्री राजमातंगी महायज्ञाचा संकल्प !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने झाला राष्ट्रहितार्थ व्यापक संकल्प !
उच्च कोटीच्या संतांनी महायज्ञाचे यजमानपद भूषवले । राष्ट्ररक्षण आणि लोककल्याणार्थ दैवी बळ वृद्धींगत केले ।।

देवीची आराधना !

अधिवक्ता श्री. आणि सौ. पुनाळेकर यांचे चैतन्यदायी श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्रपठण !
श्री गणपति होमाद्वारे गणेशाची आराधना आणि मंत्रोच्चारासह केला श्री राजमातंगी आणि परिवार देवता यांचा होम !
कुंकूमार्चन !

देवीतत्त्वाला आकर्षित करणारे कुंकू हे शक्तितत्त्वाचे प्रतीक आहे. श्री राजमातंगीदेवीसमवेत दशमहाविद्या आदिशक्तींची कृपा होण्यासाठी ललिता त्रिशती कुंकूमार्चनाद्वारे देवीला आवाहन करण्यात आले ! सहयजमानांनी हे कुंकूमार्चन भावपूर्ण केले.
भारताचे संरक्षण आणि लोककल्याण यांसाठी ‘सामूहिक संकल्प’ !

शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती यांनी यजमान, सहयजमान, तसेच ८ सहस्रांहून अधिक प्रत्यक्ष आणि भारतासह ४० देशांतील ऑनलाईन जोडलेल्यांकडून समष्टी संकल्प करवून घेतला. या वेळी सर्वांनी हात जोडून त्यांच्या मागून संस्कृत भाषेच्या संकल्पातील एक एक शब्दाचा पुनरुच्चार केला !
आहुती समर्पित !

श्री राजमातंगीदेवीच्या मूलमंत्रांनी यज्ञामध्ये आहुती समर्पित करण्यात आल्या. या वेळी ९६ प्रकारच्या १०८ द्रव्यांची आहुती देण्यात आली. आहुती अर्पण करण्यामागे ‘देवीने दिलेले देवीला अर्पण करणे’, हाच भाव असतो !
महायज्ञाची महापूर्णाहुती !
महायज्ञामध्ये काही अल्प-अधिक राहिले असेल, तर त्याचे निरसन होण्यासाठी पूर्णाहुती देण्यात येते. शत्रूवर नियंत्रण प्राप्त करण्याची क्षमता असणार्या श्री राजमातंगी यज्ञाचे पूर्ण फळ मिळण्यासाठी वस्त्र आणि तुपाची संततधार अर्पण करून महापूर्णाहुती दिली !

साक्षात् वेदनारायणस्वरूप ‘त्यागातून समृद्धी’ हा संदेश देणारा श्री राजमातंगी महायज्ञ म्हणजे ‘रामराज्यनिर्मिती’च्या दिशेने उचललेले एक पाऊलच !
श्री राजमातंगीदेवीची आरती !
आरती म्हणजे देवीची स्तुती ! श्री राजमातंगीदेवीची कृपा संपादन करण्यासाठी तिची स्तुती करून हा यज्ञ फलदायी होण्यासाठी देवीला प्रार्थना करण्यात आली. उपस्थित भाविक आणि दर्शक यांनी केलेल्या भावपूर्ण आरतीने महायज्ञ यथासांग झाला !

सनातन भारतीय वैदिक संस्कृतीतील विलक्षण यज्ञपरंपरा विज्ञानयुगातही आध्यात्मिक बळ पुरवत असल्याची प्रचीती, म्हणजेच या यज्ञाची अनुभूतीजन्य सांगता !
यज्ञमहिमा !
‘यज्ञ’ हा सनातन वैदिक संस्कृतीने आपल्याला दिलेला समृद्ध वारसा आहे !

आज विश्वभरात तिसर्या महायुद्धाचे वारे घोंघावत असतांना केवळ राजकीय प्रयत्न, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, युद्धाची सामरिक पूर्वसिद्धता, नागरिकांसाठी आपत्काळाची पूर्वसिद्धता एवढेच पुरेसे नाही, तर त्याचसमवेत राष्ट्राला आध्यात्मिक संरक्षककवचही आवश्यक आहे. साक्षात् प्रभु श्रीरामानेही अश्वमेध यज्ञ करून विश्वविजय प्राप्त केला होता. श्रीरामाच्या काळातही श्री राजमातंगीदेवीचे तत्त्व कार्यरत होते. युद्धातील स्थुलातील विजय मिळण्यापूर्वी सूक्ष्मातील आध्यात्मिक स्तरावरील विघ्न दूर होणे आवश्यक असते. श्री राजमातंगी महायज्ञाच्या फलनिष्पत्तीची प्रचीती आगामी युद्धकाळात भारताचे संरक्षण होऊन सर्वांना येईल ! आदिशक्तीची ‘प्रधानमंत्री’ असलेल्या श्री राजमातंगीदेवीने या यज्ञाच्या माध्यमातून पुरवलेले आध्यात्मिक तेज आणि ओज राष्ट्राला विजयपथावर नेईल !
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
क्रिकेटचा उदो उदो नको !