जाणूनी यज्ञाची कीर्ती । लोकप्रतिनिधींची विशेष उपस्थिती ।।

यज्ञाला उपस्थित भाजपचे आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे आणि शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे

सनातन संस्थेने देशाच्या हितासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी श्री राजमातंगी महायज्ञाचे आयोजन केले होते. हा यज्ञ अप्रतिम झाला. या यज्ञाला उपस्थित रहाता आले, हे मी माझे भाग्य समजते. भाग्यात असेल तरच हा योग येतो. ४० देशांमध्ये या यज्ञाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले. सर्वांना शक्ती आणि ऊर्जा देणार्‍या या यज्ञामुळे रामराज्य यावे, ही अपेक्षा आहे.

– आमदार डॉ. मनीषा कायंदे, शिवसेना

सनातन संस्थेच्या वतीने श्री राजमातंगी महायज्ञाचे आयोजन केले आहे. यामुळे देश आणि राज्य यांवर येणार्‍या संकटातून मुक्ती मिळावी. सर्वांना ऐश्वर्य आणि आरोग्य लाभावे, देशामध्ये, राज्यांमध्ये सुख-शांती लाभावी, अशी मी प्रार्थना करताे. मी ३ घंटे या यज्ञासाठी बसून होतो. त्यामुळे मला पुष्कळ चैतन्य आणि ऊर्जा मिळाली. हा प्रभावी महायज्ञ आयोजित केल्याविषयी मी सनातन संस्थेचे अभिनंदन करतो. या यज्ञाचा लाभ देश आणि राज्य यांतील सर्व नागरिकांना होईल, असा मला विश्वास वाटतो.

– ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार, भाजप

यज्ञस्थळी देवीचे भावपूर्ण दर्शन घेतांना मनसेचे नगरसेवक श्री. यशवंत किल्लेदार

इथे येऊन मन आनंदी आणि प्रसन्न झाले आहे. एवढा मोठा महायज्ञ मुंबईसारख्या ठिकाणी होणे, हा एक सुखद अनुभव आहे. सनातन संस्थेने एवढा भव्य-दिव्य आणि अलौकिक असा महायज्ञ राष्ट्राची सुरक्षा अन् लोककल्याण यांसाठी आयोजित केलेला आहे. असे यज्ञ होणे अत्यंत आवश्यक आहे. मी यज्ञसंस्कृतीचा पुरस्कर्ता असून सनातन संस्थेविषयी कृतज्ञ आहे.

– यशवंत किल्लेदार, नगरसेवक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना