सनातनच्या ठाणे आणि पुणे येथील साधकांचे १० वीत सुयश !

ठाणे येथील कु. अगस्त्य अभ्युदय कस्तुरे याचे सुयश !

ठाणे – येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. मुक्ता देशपांडे यांचा नातू कु. अगस्त्य अभ्युदय कस्तुरे याने पोतदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवड येथून इयत्ता १० वीच्या सीबीएस्ई बोर्डाच्या परीक्षेत ९३.५ टक्के गुण मिळवले. त्याने आयटीमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले असून कुठल्याही शिकवणीवर्गाला न जाता त्याने हे यश मिळवले. या यशाचे श्रेय त्याने श्री गणपति, श्री सरस्वती, तसेच शिक्षक, आई-वडील यांना दिले.

कु. सुकृता कांडलकर हिला १० वीच्या परीक्षेत ९०.८० टक्के गुण !

पुणे – सिंहगड रस्ता येथील कु. सुकृता पांडुरंग कांडलकर हिला एस्.एस्.सी. बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेत ९०.८० टक्‍के गुण मिळाले आहेत. संस्कृत मध्ये १०० पैकी ९६, तर शास्त्र या विषयात १०० पैकी ९३ गुण प्राप्त झाले आहेत. ती ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल’मध्ये शिकत होती. ती नियमित प्रार्थना, भावजागृतीचे प्रयत्न, आत्मनिवेदन करते. ‘हे यश मिळवणे गुरुदेवांच्‍या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) आणि सनातनच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या कृपेमुळे शक्‍य झाले’, असे तिने सांगितले.