‘सत्पुरुषा’ची वा साधूची लक्षणे !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

साधुत्वाच्या नावाखाली आपल्या समाजामध्ये जो दंभाचार वाढला आहे. टिळे- माळा, मोठी शिष्यशाखा, भजन-पूजनाचे उत्सव महोत्सव, भंडारे, मोठा वैभवशाली मठ किंवा वक्तृत्वसंपन्न धार्मिक प्रवचने ऐकण्यासाठी सहस्रोंनी लोक गोळा होतात, असे पाहून त्या त्या व्यक्तीला आपण साधू वा सत्पुरुष समजतो. सत्पुरुषाजवळ वरील काही असेलही किंवा नसेलही; पण ते साधुत्वाचे लक्षण ठरू शकत नाही. निःस्वार्थीपणा, निःस्पृहता, ईश्वरनिष्ठा, शुद्ध चारित्र्य, आत्मज्ञान असणे आणि लोकेषणा (प्रसिद्धीची हाव), दारेषणा (संसाराची इच्छा), धनेषणा (संपत्तीची लालसा) यांचा अभाव ही लक्षणे ज्याच्याजवळ आहेत, त्यालाच ‘सत्पुरुष’ म्हणावे. हीच लक्षणे सर्वभूतहितत्वाची अंगोपांगे आहेत.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ‘यक्ष प्रश्न’ या ग्रंथातून)