अनिष्ट शक्ती स्वभावदोषांच्या माध्यमातून त्रास देत असल्याने साधकांनी अधिकाधिक लक्ष स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाकडे द्यायला हवे ! 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अनमोल मार्गदर्शन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

एक साधिका : ‘स्वभावदोषांच्या माध्यमातून माझ्या बाबांवर अनिष्ट शक्तीचे आक्रमण होत असते’, असे माझ्या लक्षात येते; कारण ज्या दिवशी ते आतून पुष्कळ चिडलेले असतील, त्या रात्री त्यांना अधूनमधून जाग येते. तेव्हा ‘बाबांवर अनिष्ट शक्तींचे आक्रमण होते’, असे मला वाटते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘राग येणे आणि भांडण करणे’ हे अनिष्ट शक्तींचेच त्रास आहेत. यासाठीच अनिष्ट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांना आपण अधिकाधिक लक्ष स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाकडे द्यायला सांगतो. त्यासाठी सगळ्यांनीच एकमेकांना साहाय्य करायला हवे.’

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.