बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांचे पोलिसांना रझाकारी आदेश
प्रमाणापेक्षा अधिक जनावरांची वाहतूक करणार्यांवर कारवाई करणे अवैध !

मुंबई – जनावरांची वाहतूक करणारी वाहने अडवणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच प्रमाणापेक्षा अधिक जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी जनावरांच्या व्यापार्यांवर कारवाई करणे अवैध आहे, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी २८ मे या दिवशी असलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना दिल्या आहेत, अशी माहिती समाजवादी पक्षाचे भिवंडी (पूर्व) चे आमदार रईस शेख यांनी दिली. मुंबईतील अल्पसंख्यांक समाजाचे सर्वपक्षीय आमदार, तसेच राज्य खाटिक महासंघाचे प्रतिनिधी यांची मंत्रालयात प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या समवेत बैठक झाली. यानंतर शेख बोलत होते.
बकरी ईदच्या निमित्ताने देवनार पशूवधगृहात कत्तलीसाठी असलेले २०० रुपयांचे शुल्क २० रुपये करण्यात आले. मुंबईमध्ये कत्तलीसाठी असलेली ७० ठिकाणे वाढवून ती १०९ करण्यात आली. काही गृहनिर्माण संस्थांना कत्तलीसाठी आधीच परवाने दिलेले आहेत. दुकानदारांनाही तशी अनुमती देण्यात आली आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा