
१. रात्री झोपतांना डोळे बंद केल्यावर विशाल शिवलिंगाचे दर्शन होणे, ‘स्वप्नात शिवलिंगाची पूजा करत आहे’, असे दिसणे आणि झोपेतही भावावस्था अनुभवता येणे
‘२.५.२०२६ या दिवशी मला अकस्मात् भगवान शिवाचे स्मरण होऊ लागले. मी रात्री झोपतांना डोळे बंद केल्यावरही भगवान शिवाचे विशाल शिवलिंगाच्या रूपात दर्शन होऊ लागले. त्यानंतर मला झोप लागली. नंतर मला स्वप्नात दिसले, ‘मी त्या शिवलिंगावर सूक्ष्मातून जल आणि दूध यांचा अभिषेक केला. मी शिवलिंगाची पूजा करत आहे’, असे दृश्य मला दिसू लागले. मी शिवलिंगाची पूजा करत असतांना स्वप्नातही भावावस्था अनुभवू शकले.
२. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर शिवाच्या दर्शनाची इच्छा होणे आणि गुरूंच्या कृपेने ती इच्छा पूर्ण होणे

दुसर्या दिवशी मी सकाळी उठल्यावर माझ्या मनात भगवान शिवाच्या दर्शनाची तीव्र इच्छा जागृत झाली. माझ्या मनात ‘उज्जैन येथील महाकालेश्वराचे दर्शन घ्यायला पाहिजे’, असा विचार आला.
२ अ. सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशाचे आश्रमात आगमन होत असतांना त्यांचे स्वागत करण्याच्या सेवेची संधी मिळणे आणि त्या दिव्य अंशाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभणे : ४.५.२०२६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील फलकावर लिहिले होते, ‘सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशाचे आजच आश्रमात आगमन होणार आहे.’ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या शुभ हस्ते सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशाचे आश्रमात आगमन झाले. ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशाचे आगमन होत असतांना मला त्यांचे स्वागत करण्याच्या सेवेची संधी मिळाली आणि त्यांचे दर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले.
२ आ. या अनुभूतीच्या माध्यमातून ‘स्थुलातून प्रत्यक्ष घडण्यापूर्वी ती गोष्ट सूक्ष्मातून घडलेली असते’, याची मला प्रचीती आली. ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची अनुभूती मला २ दिवसांपूर्वीच देवाने दिली आणि २ दिवसांनंतर ते सर्व स्थुलातून घडले.
३. ‘आपला संपूर्ण भार गुरूंवर सोपवल्यावर गुरूंच्या कृपेनेच आपल्या इच्छा पूर्ण होत असणे
त्या क्षणी माझ्या मनात विचार आला, ‘आपण आपला संपूर्ण भार जेव्हा गुरूंवर सोपवतो, तेव्हा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला काहीच प्रयत्न करावे लागत नाहीत. गुरूंच्या कृपेनेच आपल्या इच्छा पूर्ण होतात.’
४. समाजातील लोकांना तीर्थयात्रा कराव्या लागतात किंवा देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जावे लागते. आपले गुरु एवढे महान आहेत की, साधकांना आश्रमातच देवाचे दर्शन हाेते.’
– कु. कुहु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.५.२०२६)
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !
साधना, परिपूर्ण सेवा आणि गुरुकृपा दर्शवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीचे भावमोती !
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे