Bandra Bulldozer Action : वांद्रे (मुंबई) येथील अवैध मशीद हटवतांना मुसलमानांनी केली पोलिसांवर दगडफेक !

  • पोलिसांच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेत घडला प्रकार

  • तब्बल ५०० हून अधिक झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण

मुंबई – येथील वांद्रे रेल्वेस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात येत आहेत. येथे असलेल्या अवैध मशिदीवर बुलडोझर फिरवला जात असतांना तेथील मुसलमानांनी त्यास विरोध केला. त्यांनी पोलिसांवर बाटल्या आणि अन्य वस्तू फेकल्या, तसेच मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. येथील वाढती गर्दी पहाता पोलिसांनी अधिकची कुमक मागवली आहे. दंगलविरोधी पथकही येथे आले आहे. सलग दुसर्‍या दिवशी अतिक्रमण हटवण्याची कारवाई चालू आहे. मुंबईतील वांद्रे भागातील रेल्वेच्या हद्दीतील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी एकाने वांद्रे येथील रेल्वेस्थानक परिसरातील झोपडपट्टीच्या अतिक्रमणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित केला होता. त्यानंतर रेल्वेने ही अतिक्रमणविरोधी कारवाई केली.

वांद्रे रेल्वेच्या हद्दीत ५ सहस्र चौरस मीटर इतके अतिक्रमण आहे. येथे ५०० हून अधिक झोपडपट्ट्या आहेत. काही दिवसांपूर्वी अतिक्रमणविरोधी कारवाई झाल्यावर अतिक्रमणकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याला राजकीय पाठबळ असल्याने कारवाई थांबवण्यात आली होती; पण आता पुन्हा कारवाई चालू झाली आहे. आणखी काही दिवस कारवाई चालू रहाणार असल्याचे समजते.

रेल्वे अधिकार्‍यांची भूमिका !

या प्रकरणी रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले, ‘‘प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यातील विकासकामांसाठी अतिक्रमण हटवणे अत्यावश्यक आहे. रेल्वे मार्गालगत वाढलेल्या झोपड्यांमुळे अपघाताचा धोकाही वाढत आहे. संबंधित भूमी मोकळी झाल्यास ‘वांद्रे टर्मिनस’चा विस्तार करणे, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांची क्षमता वाढवणे शक्य होणार आहे. वाहतूक कोंडी न्यून होईल आणि भविष्यात वांद्रे रेल्वेस्थानकाचा विकास ‘वर्ल्ड क्लास टर्मिनस’ (जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक) म्हणून केला जाणार आहे.’’

कारवाईची व्याप्ती !

मुंबई पोलिसांचे ४०० अधिकारी-कर्मचारी, रेल्वे पोलिसांसह रेल्वे संरक्षण दलाचे ४०० सैनिक, तसेच पश्चिम रेल्वेचे २०० पोलीस अशा एकूण १ सहस्र जणांच्या फौजफाट्याच्या उपस्थितीत १२ जेसीबी, दोन पोकलेन, १२ ट्रक अशा साधनांसह तोडकाम करण्यात येत आहे. या कारवाईमुळे ६०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली भूमी पश्चिम रेल्वेच्या पुन्हा कह्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

  • काही दिवसांपूर्वी गुजरातच्या राजकोटमध्ये पोलिसांनी हिंदूंच्या कथित अवैध मंदिरांवर बुलडोझर फिरवला. त्या वेळी हिंदूंनी केवळ शाब्दिक विरोध केला. मुंबईतील घटनेतून मात्र धर्मांध मुसलमानांच्या लेखी कायदा-सुव्यवस्थेचे मूल्य शून्यच आहे, हेच लक्षात येते !
  • वांद्रेप्रमाणे मुंबईत आणखी किती ठिकाणी अशी अतिक्रमणे करण्यात आली आहेत, याची चौकशी झाली पाहिजे अन् त्यांनुसार त्यांच्यावरही बुलडोझर फिरवला गेला पाहिजे. या जोडीला अतिक्रमण करून बांधकाम होऊ देणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवरही आता कारवाईची मोहीम चालू झाली पाहिजे !