प्रसिद्ध तमिळ अभिनेता जय याने दिली माहिती

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळ अभिनेता जय याने मंदिरात अपमान झाला म्हणून हिंदु धर्म सोडत इस्लाम स्वीकारला आहे, याची माहिती स्वतः जय याने एका मुलाखतीत दिली. वर्ष २०११ पासून तो इस्लामचे पालन करत असल्याचे त्याने सांगितले. त्याने अद्याप नाव पालटलेले नाही.
“After being repeatedly insulted in temples, I left Hinduism and accepted Islam,” says Tamil actor Jai.
If some people insulted him in a temple, they may have been wrong – but how can the entire religion be blamed for it?
Changing one’s religion over such incidents is a serious… pic.twitter.com/yXlAfZewb0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 20, 2026
जय मुलाखतीत म्हणाला की,
१. मी शबरीमलासाठी गळ्यात माळ घातली होती. त्यानंतर एक वर्ष येशूसाठी माळ घालून उपवासही केला होता; पण एक वेळ अशी होती, जेव्हा मंदिरात वारंवार माझा अपमान केला गेला. अशा काही घटना घडल्या ज्यामुळे मला वाईट वाटले.
२. जेव्हा मी मशिदीत गेलो, तेव्हा पाहिले की, सगळे एका रांगेत उभे राहून प्रार्थना करत आहेत. तिकडे सगळ्यांना ठाऊक होते की, मी अभिनेता आहे. तरीही मशिदीमध्ये कुणीच माझ्यासमवेत बोलले नाही. मशिदीमधून बाहेर आल्यावरच काही लोक माझ्यासमवेत बोलले. तेही अगदी नम्रतेने. कुणीही मला छायाचित्रासाठी आग्रह केला नाही.
३. तेव्हा मला असे वाटले की, इथे सगळे समान आहेत. (इस्लामचा अभ्यास आणि वर्तमान ठाऊक नसल्याने अशा प्रकारचे गैरसमज होतात ! – संपादक) मशिदीमध्ये गेल्यावर केवळ अल्ला सर्वोच्च आहे. कितीही मोठी व्यक्ती आली, तरी तिला समान वागणूक मिळते. मशिदीमध्ये तुम्ही प्रार्थना करत असतांना कुणीही धक्काबुक्की करत नाही किंवा कुणी तिथून जायला सांगत नाही. जेवढा वेळ तुम्हाला तिथे थांबायचे आहे तुम्ही तितका वेळ बसून प्रार्थना करू शकता.
४. इस्लाम स्वीकारल्यापासून माझ्या स्वभावातही पुष्कळ पालट जाणवला आहे. वर्ष २०१९ मध्ये मी धर्मांतर केले. माझी इस्लामवर श्रद्धा आहे. घरी सगळे आनंदी आहेत; कारण जो मुलगा कोणत्याच देवाची पूजा करत नव्हता तो आता धार्मिक झाला आहे. (पुढे तो धर्मांध झाला नाही म्हणजे मिळवले ! – संपादक) धर्मांतर केल्यानंतरही मी अजून स्वतःचे नाव पालटलेले नाही. मी माझे नाव पालटून अझीज जय ठेवायचा विचार करत आहे.
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !