सौंदत्ती (जिल्हा बेळगाव) श्री रेणुकादेवी मंदिराला ३१ कोटी रुपयांचे दान !

बेळगाव (कर्नाटक) – महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश यांसह विविध राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी मंदिराला २०२५-२६ या आर्थिक वर्षात ३१ कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. कर्नाटक राज्यातील सर्वाधिक देणगी मिळवणार्‍या मंदिरांच्या सूचीत या मंदिराचे ५ वे स्थान आहे. कर्नाटक राज्यात सर्वाधिक देणगी कुक्के सुब्रह्मण्यम् या प्रसिद्ध मंदिराला मिळाली असून वर्षभरात भाविकांनी तिथे १६८ कोटी रुपयांची देणगी अर्पण केली आहे.