
पुणे – बाणेर येथे सर्व्हे क्रमांक ३३ मध्ये महापालिकेने ४० कोटी रुपये खर्चून २५ सहस्र चौरस फुटांची अद्ययावत् इमारत उभारली; मात्र ही सर्व मालमत्ता ५०० रुपयांच्या ‘स्टँप पेपर’वर (शासकीय शुल्काच्या कागदावर) एका फाऊंडेशनला रुग्णालय चालवण्यासाठी दिली. महापालिकेच्या नियमानुसार कोणतीही मालमत्ता विनाभाडे देता येत नाही. तरीही हा निर्णय घेतल्याचा आरोप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला. ज्या संस्थेला ही इमारत दिली त्या संस्थेची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे कोणतीही नोंद नाही.
महापालिकेच्या सुविधा वापरून हे रुग्णालय चालवले जात असतांना रुग्णांची लूट होत आहे. राज्य सरकारच्या लोकोपयोगी आरोग्य योजनाही येथे राबवल्या जात नाहीत, असा आरोप बालवडकर यांनी केला. बाणेर येथे महापालिकेच्या इमारतीत चालू असलेल्या रुग्णालयाला नोटीस बजावली असून त्यांची चौकशी होईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !