बीड येथे ‘हिंदु जन आक्रोश मोर्चा’
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाला चेतावणी

बीड – पोलीस प्रशासनाला आजच सांगतो की, २६ मे (ईदच्या दिवशी) या दिवशी बैल कापला, तर २७ मे या दिवशी आम्ही येथे येऊ. तुम्ही जरा काळजी घ्या. राजकीय पक्ष काम करत नसले, तरी आपल्याला हिंदु म्हणून काम करावे लागेल. या लोकांशी (मुसलमानांशी) कोणताही आर्थिक व्यवहार करायचा नाही, हा कायदा करण्याविषयी आपल्याला ठरवावे लागणार आहे. आपले संघटन कायम ठेवा, हिंदु समाज कधीही थांबणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी केले. येथील नेकनूरमध्ये ‘हिंदु जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. ‘हिंदु जन आक्रोश मोर्चा’नंतर आयोजित सभेमध्ये बोलतांना आमदार संग्राम जगताप यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाला चेतावणी दिली. या मोर्चाला भाजपचे आमदार महेश लांडगे हेही उपस्थित होते.
आरंभ ते लोक करतात आणि आम्ही शेवट करतो ! – आमदार संग्राम जगतापआरंभ ते लोक करतात आणि आम्ही शेवट करतो. जनगणना झाली, तर त्यांची संख्या ४० कोटींच्या पुढे जाईल. ६ वर्षांच्या मुलीपर्यंत येण्याचे त्यांचे धारिष्ट्य झाले आहे, ही विचारधारा हिंदुत्वनिष्ठ लोकांनी विसरता कामा नये. तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर हे लोक पोलीस ठाण्यामध्ये आले, त्यांनी दगडफेक केली. हे लोक भयभीत करतात; परंतु या झुरळांना आता घाबरण्याची आवश्यकता नाही. |
सर्वधर्मसमभावाचा बुडबुडा फोडला पाहिजे ! – महेश लांडगे, आमदार, भाजप![]() ६ वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न होतो; पण पीडितांना साहाय्य केले जात नाही. सर्वधर्मसमभावाचा बुडबुडा फोडला पाहिजे. आपल्यामध्ये काही पुरो(अधो)गामी विचारांचे किडे आहेत. या विचारांच्या राजकीय लोकांना लाज वाटली पाहिजे. छत्रपती संभाजीनगरला एकाचे घर पाडले. पोलिसांनी जरा गांभीर्याने घ्यावे. पोलीस अशा पद्धतीने पक्षपात करतील, न्याय देणार नाहीत आणि जर दंगल झाली, तर त्याला तुम्ही (पोलीस) उत्तरदायी असाल. |

गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
गावाचे शहरीकरण करण्याविषयी मत मागवणारे परिपत्रक गोवा सरकारने मागे घेतले !
हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !
भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !