Mirzapur Gym Jihad : ‘लव्ह जिहाद’ टोळीतील १० आरोपींच्या विरोधात ‘गँगस्टर ॲक्ट’खाली कारवाई !

मिर्झापूर (उत्तरप्रदेश) येथील ‘जिम जिहाद’ प्रकरण

(‘जिम जिहाद’ म्हणजे व्यायामशाळेत येणार्‍या हिंदु महिलांना तेथील धर्मांध प्रशिक्षकांनी प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण करणे)

मिर्झापूर (उत्तरप्रदेश) – शहरात ‘जिम जिहाद’ आणि धर्मांतर प्रकरणांविषयी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कडक भूमिका घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार महिलांविरुद्ध गुन्हे करणार्‍या ‘लव्ह जिहाद’ टोळीतील १० आरोपींच्या विरोधात ‘गँगस्टर ॲक्ट’च्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी मौलवी खलीलुर रहमान, जिम प्रशिक्षक इम्रान खान यांच्यासह १० आरोपींवर लव्ह जिहादची संघटित टोळी चालवल्याचा आरोप आहे.

१. अन्वेषण यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळी पूर्ण नियोजनासह हिंदु महिलांना जाळ्यात ओढून त्यांना लक्ष्य करत असे.

२. ही टोळी व्यायाम प्रशिक्षणाच्या बहाण्याने हिंदु महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवत असे. त्यानंतर या जिहाद्यांकडून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले जायचे. त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे बनवून त्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल केले जात असे.

३. पोलीस या टोळीशी संबंधित इतर जिहाद्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

उत्तरप्रदेशचा ‘गँगस्टर ॲक्ट’ काय आहे ?

‘उत्तर प्रदेश गुंड आणि समाजविघातक कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, १९८६’ हा एक कठोर कायदा आहे, ज्याचा वापर संघटित गुन्हेगारी आणि गुन्हेगारी टोळ्यांचे उच्चाटन करण्यासाठी केला जातो. या कायद्यांतर्गत दोषी ठरल्यास किमान २ वर्षे आणि कमाल १० वर्षांच्या कारावासाची, तसेच किमान ५ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली जाते. गुन्हेगारांनी त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांतून संपादन केलेल्या मालमत्ता आणि संपत्ती शोधून त्या जप्त करण्याचे अधिकार प्रशासनाला प्राप्त होतो.