(लिट्टे म्हणजे ‘लिबरेशन टायगर ऑफ तमिल इलम्’ - तमिळ राष्ट्र मुक्ती वाघ)

चेन्नई (तमिळनाडू) – भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची आणि भारतीय सैनिकांची हत्या करणारा ‘लिट्टे’चा प्रमुख व्ही. प्रभाकरन् याची १८ मे या दिवशी पुण्यतिथी होती. त्याला तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी श्रद्धांजली वाहिली. वर्ष २००९ मध्ये श्रीलंकेतील मुल्लीवाइक्कल येथे श्रीलंकेच्या सैन्याने प्रभाकरन्वर गोळ्या झाडून त्याला ठार मारले होते. विशेष म्हणजे भारतात लिट्टेवर बंदी आहे. राजीव गांधी काँग्रेस पक्षाचे प्रमुख होते. याच काँग्रेस पक्षाच्या ५ आमदारंनी जोसेफ विजय यांच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. मागच्या आठवड्यात विजय यांचा शपथविधी सोहळा झाला. त्याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि राजीव गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधीसुद्धा उपस्थित होते.
Tamil Nadu CM Joseph Vijay paid tribute to LTTE chief V. Prabhakaran on May 18, saying the memories of Mullivaikkal will remain alive and Tamils will always stand with their brethren across the sea.
Will the Congress, which is supporting Vijay’s government, clarify whether it… pic.twitter.com/VDsli5DrXq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 19, 2026
प्रभाकरन्साठी विजय यांनी ‘एक्स’वर श्रद्धांजलीची पोस्ट केली. त्यात विजय यांनी लिहिले की, आम्ही मुल्लीवाइक्कलच्या आठवणी आमच्या मनात कायम ठेवू. समुद्रापलीकडे रहाणार्या आमच्या तमिळ बंधू-भगिनींच्या हक्कासाठी आम्ही नेहमी त्यांच्यासमवेत उभे राहू.
‘मुल्लीवाइक्कल स्मरण दिवसा’चे महत्त्व काय ?वर्ष १९९१ मध्ये लिट्टेने राजीव गांधी यांची हत्या घडवून आणली होती. या प्रकरणात प्रभाकरन् मुख्य आरोपी होता. जगभरात पसरलेला तमिळ समुदाय आणि भारतात रहाणारे तमिळी १८ मे हा ‘मुल्लीवाइक्कल स्मरण दिवस’ म्हणजे ‘तमिळ नरसंहार स्मरण दिवस’ म्हणून साजरा करतात. वर्ष २००९ मध्ये श्रीलंकेतील गृहयुद्ध समाप्त झाले. या दिवशी मृत्यूमुखी पडलेल्या सहस्रो तमिळ नागरिकांचे स्मरण केले जाते. मुल्लीवाइक्कल या किनारपट्टीवरील गावावर श्रीलंकेच्या सैन्याने अंतिम जोरदार प्रहार केला होता. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार युद्धाच्या या अंतिम टप्प्यात जवळपास ४० ते ७० सहस्र तमिळ नागरिकांनी प्राण गमावले होते. श्रीलंकेच्या सैन्याने नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले होते. म्हणून हा दिवस ‘मुल्लीवाइक्कल स्मरण दिवस’ म्हणून तमिळी हिंदू साजरा करतात. |
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !