सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमीपूजन आणि गुणवंत पाल्यांचा सत्कार

सिंधुदुर्गनगरी – सिंधुदुर्गातील जनतेने आम्हा राणे कुटुंबावर प्रेम केले. आशीर्वाद दिले आणि त्यामुळेच राणे कुटुंबाला राज्यात आणि देशात ओळख मिळाली, हे आम्ही कधीही विसरणार नाही. नारायण राणेसाहेबांची कारकीर्द जवळून पहाणार्या पत्रकारांना माहिती आहे की, त्यांनी मुख्यमंत्री, मंत्री आणि पालकमंत्री म्हणून असंख्य लोकांना घरे, नोकर्या आणि आयुष्य उभे करण्याची संधी दिली. माझ्या प्रत्येक निर्णयात तुम्हाला राणेसाहेबांच्या कार्यपद्धतीची झलक दिसेल. सिंधुदुर्गावर त्यांचे विशेष प्रेम आहे आणि तेच प्रेम जपण्याचे काम आम्ही करत आहोत. पत्रकार मित्रांची इच्छा होती की, पत्रकारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प व्हावा आणि त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याचे दायित्व मी घेतले आहे. या प्रकल्पामुळे पत्रकारांचे त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे सांगितले.
जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचे आणि सुरक्षित घर मिळावे, या उद्देशाने उभारण्यात येणार्या ‘दर्पण’ या पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमीपूजन आणि पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा १७ मे या दिवशी सिंधुदुर्गनगरी येथे पार पडला. या वेळी मंत्री राणे बोलत होते. या सोहळ्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मराठी राज्य पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस्.एम्. देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, सचिव दिलीप खडपकर, पदाधिकारी, पत्रकार, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, ‘‘पत्रकारांसाठीचा हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल. आज भूमीपूजन झाले असले, तरी लवकरच हा प्रकल्प पूर्ण होऊन पत्रकारांना घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडेल. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे उपस्थित असतील.’’
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, ‘‘राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात पत्रकारांसाठी अशा प्रकारचा प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा ठरला आहे. पालकमंत्री प्रत्येक क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अग्रेसर रहावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि त्याचाच हा भाग आहे.’’ या वेळी अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली.
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था