‘माझ्या सासूबाई कै. (श्रीमती) प्रभावती गजानन शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ९० वर्षे) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहात होत्या. त्यांची सेवा करण्यासाठी मी तेथे गेले होते. त्या रुग्णाईत असल्याने त्यांचे सर्व अंथरुणावरच करावे लागत होते. त्यांच्या सर्व प्रकारच्या सेवा करतांना माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे.

१. स्वभावदोषांमुळे आरंभी सासूबाईंची सेवा करतांना संघर्ष होणे आणि चिंतन केल्यावर ‘सासूबाईंच्या समवेत देवाण-घेवाण हिशोब असल्याने ‘देवाने ही सेवा दिली आहे’, हे लक्षात येणे

‘वर्ष २०२५ मध्ये माझ्या सासूबाई कै. (श्रीमती) प्रभावती गजानन शिंदे पाय घसरून पडल्या. त्यानंतर मात्र त्या परत उठू शकल्या नाहीत. मला त्यांची सर्व सेवा करावी लागत होती. (त्यांना महाप्रसाद आणून देणे, त्यांचे कपडे धुणे, औषध देणे, खोली स्वच्छता करणे, त्यांना आधुनिक वैद्यांकडे नेणे -आणणे, त्या रुग्णालयात भरती झाल्यावर तेथील सर्व सांभाळणे) मी त्यांची सेवा करून मधे मधे स्वयंपाकघरात १ – २ घंटे सेवा करत होते. आरंभी सासूबाईंची सेवा करतांना माझ्या मनात त्यांच्याकडून अपेक्षा आणि त्यांच्याबद्दल पूर्वग्रह असायचा, तसेच माझी स्वीकारण्याची वृत्तीही अल्प होती. त्यामुळे माझ्या मनाची नकारात्मक स्थिती होती. त्यानंतर माझे हळूहळू स्वतःचे चिंतन होऊ लागले, ‘देवाने मला ही सेवा का दिली असेल ?’ ‘सासूबाईंच्या समवेत माझे काहीतरी देवाण-घेवाण हिशोब आहेत. त्यासाठी ‘देवाने मला ही सेवा दिली आहे.’ नंतर मी दिवसभरात घडणार्या प्रत्येक प्रसंगाचा अभ्यास करू लागले.
२. मनाच्या स्थितीचा अभ्यास करणे आणि लक्षात आलेले स्वभावदोष दूर होण्यासाठी स्वयंसूचना सत्रे करणे
सासूबाईंना मध्ये मध्ये विस्मरण होत होते. त्यामुळे मला त्यांना प्रत्येक गोष्ट ५ – ६ वेळा सांगावी लागायची. ती गोष्ट त्यांना पुनःपुन्हा सांगत असतांना ‘माझ्या मनाची कुठे चिडचिड होत आहे का ?’, याकडे मी लक्ष देऊ लागले. माझ्या मनाच्या स्थितीचा मी अभ्यास करत होते. नंतर माझ्या हळूहळू लक्षात येऊ लागले, ‘काही प्रसंगांत माझ्या मनाची चिडचिड होत आहे.’ ते प्रसंग मी वहीत लिहून त्यावर स्वयंसूचना सत्र करत असे. काही प्रसंगांत माझ्यातील ‘पूर्वग्रह’ हा स्वभावदोष उफाळून येत असे आणि काही वेळा भूतकाळात घडलेल्या प्रसंगांविषयी अनेक विचार तीव्रतेने माझ्या मनात येत असत. त्या वेळी मी पुन्हा मनाला स्वयंसूचना देत होते.
३. सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या साधकांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याला बसण्याची संधी मिळणे आणि प्रत्येक साधक देत असलेला आढावा ऐकून विचार योग्य दिशेने होऊ लागणे
सद्गुरु राजेंद्र शिंदे (माझे यजमान) देवद, पनवेल येथील काही साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. ते घेत असलेला साधकांचा आढावा मी ऐकत होते. तेव्हा प्रत्येक साधक देत असलेला आढावा ऐकून माझ्या मनावर कळत-नकळत परिणाम होऊ लागला. माझ्या विचारांना योग्य दिशा मिळायला लागली. ‘माझ्याकडून सेवा मनापासून होत आहे का ?’, याचे माझे मनन आणि चिंतन होऊ लागले.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या भक्तीसत्संगातील मार्गदर्शनाचा लाभ होणे आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्याने काही प्रसंग सहजतेने स्वीकारता येणे
‘पूर्वग्रह असणे आणि अपेक्षा करणे’ या स्वभावदोषांमुळे माझी हानीच होणार आहे. त्यापेक्षा ‘आता वर्तमानात मला काय करायचे आहे’, याचा विचार करणे आवश्यक आहे. मी ‘देवाला आत्मनिवेदन करणे, शरणागतभाव वाढवणे, देवाच्या चरणी क्षमायाचना करणे आणि सेवेला भावाची जोड देणे’, यांसारखे प्रयत्न केले. तेव्हा मला काही प्रसंग सहजतेने स्वीकारता आले. त्याच कालावधीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे भक्तीसत्संगातील कुटुंबातील प्रसंग स्वीकारण्याच्या वृत्तीच्या संदर्भातील मार्गदर्शन होऊ लागले. त्यामुळे माझे चिंतन अधिकच होऊ लागले.
५. सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मन स्थिर होऊन सेवेतून आनंद मिळणे
‘सेवा अधिक भावपूर्ण आणि परिपूर्ण कशी होईल’, असा विचार करून मी सेवा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझे मन स्थिर होऊ लागले. मला सेवा करतांना आनंद मिळू लागला. ‘देवच मला सेवा करण्यासाठी बळ देत आहे आणि तोच माझ्याकडून सेवा करून घेत आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्यामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. मला भक्तीसत्संगात आत्मनिवेदनही करता आले.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले), केवळ तुमच्याच कृपेमुळे मी सासूबाईंची सेवा करू शकले’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मीनल राजेंद्र शिंदे, फोंडा, गोवा. (२५.४.२०२६)
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती