भिलवडी (सांगली) येथे लाच घेतांना हवालदाराला अटक ! 

भ्रष्टाचाराने पोखरलेली पोलीस यंत्रणा !

सांगली – भिलवडी पोलीस ठाण्यातील हवालदार संतोष बेंबडे (वय ४७ वर्षे, रा. कवठेमहाकांळ) याला ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक केली. तक्रारदाराच्या भिलवडी येथील एका प्रकरणात पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी देऊन साहाय्य करण्यासाठी प्रारंभी १० सहस्र रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ८ सहस्र रुपयांवर सौदा ठरवून त्यातील ५ सहस्र रुपये स्वीकारतांना अटक केली.