‘डिजिटल युगात जिथे तंत्रज्ञान प्रगतीचे साधन मानले जाते, तिथेच त्याचा वापर विघातक शक्तींकडून तरुणांना भरकटवण्यासाठी केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रतिबंधित आतंकवादी संघटना ‘इसिस’चा ऑनलाईन प्रचार आणि कथित कट यांच्या प्रकरणी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक अन् देहली पोलिसांचे विशेष पथक यांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत महाराष्ट्रातील २ तरुणांना अटक करण्यात आली असून अवघ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलासह अन्य एकाचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत २ प्रमुख संशयितांना ताब्यात घेण्यात आले. महंमद हमाद सिद्दीकी (वय १८ वर्षे) कुर्ला येथील रहिवासी असलेला हा विद्यार्थी १२ वीत शिकत आहे. मोसाईब अहमद उर्फ सोनू (वय ३३ वर्षे) ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील हा तरुण ‘ऑटो इलेक्ट्रिकल मेकॅनिक’ म्हणून काम करतो. या दोघांच्या व्यतिरिक्त ओडिशामधून ‘बडा इम्रान’ नावाच्या एका संशयित ‘हँडलर’ला अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती ‘इसिस’च्या ऑनलाईन प्रचाराचे मुख्य जाळे चालवत असल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे.

१. रडारवर आलेले नवे संशयित
अन्वेषणाची चक्रे फिरल्यानंतर यंत्रणांच्या हाती आणखी २ महत्त्वाची नावे लागली आहेत. यामध्ये कांदिवली येथील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याचा समावेश असल्याने सुरक्षायंत्रणा चक्रावून गेल्या आहेत. इतक्या लहान वयात मुलांना कट्टरपंथीय विचारधारेकडे कसे वळवले जाते, हा आता चिंतेचा विषय झाला आहे. यासमवेतच ठाण्यातील एका फायनान्स कंपनीत काम करणार्या यासीर खान (वय २७ वर्षे) यालाही चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली असून त्याच्या घरी झडती घेण्यात आली आहे.
ऑनलाईन गेमिंग : भरकटवण्याचे नवीन अस्त्र

अन्वेषण यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील सर्वांत धक्कादायक, म्हणजे संवादासाठी वापरले जाणारे माध्यम संशयित आरोपी ‘पबजी’ आणि ‘फ्री फायर’ यांसारख्या लोकप्रिय ‘ऑनलाईन गेम्स’चा वापर करत होते.
अ. प्रारंभीचा संपर्क : ‘गेमिंग प्लॅटफॉर्म’वर गप्पा मारतांना (In – game chat) ओळखी वाढवल्या जायच्या.
आ. हळूहळू ‘ब्रेनवॉश (बुद्धीभेद) : प्रारंभीला मैत्रीपूर्ण संभाषण करून नंतर धार्मिक कट्टरतेचे बीज पेरले जायचे.
इ. ‘एन्क्रिप्टेड ॲप्स’चा वापर : एकदा विश्वास संपादन झाला की, पुढील संभाषण ‘टेलिग्राम’ किंवा ‘सिग्नल’ यांसारख्या सुरक्षित आणि ‘एन्क्रिप्टेड ॲप्स’वर हलवले जायचे, जेणेकरून अन्वेषण यंत्रणांची नजर टाळता येईल. – संतोष वाघ
२. कुटुंबियांचा आक्रोश आणि संभ्रम
अटक करण्यात आलेल्या महंमद हमाद सिद्दीकीच्या वडिलांनी मुलावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटले आहे, ‘माझा मुलगा अभ्यासात हुशार आहे. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी कर्ज काढून त्याला शिकवत होतो. तो घंटोन्घंटे भ्रमणभाषवर ऑनलाईन गेम्स खेळायचा; पण तो अशा कोणत्या गंभीर गुन्ह्यात सहभागी असेल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते.’ पोलिसांना घरातून केवळ भ्रमणभाष मिळाला असून इतर कोणतेही संशयास्पद साहित्य मिळाले नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
हे ही पहा →
|
३. राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि पुढील अन्वेषण
अन्वेषण यंत्रणांना संशय आहे की, हे तरुण परदेशी हँडलर्सच्या संपर्कात होते आणि भारतातील काही महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा त्यांचा कट होता. अटक करण्यात आलेल्या हमाद आणि मोसाईब यांना मुंबईतील विशेष न्यायालयात उपस्थित करून त्यांचा ‘ट्रान्झिट रिमांड’ संमत करण्यात आला आहे. (‘ट्रान्झिट रिमांड’, म्हणजे एखाद्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अन्य राज्यातून अटक केल्यानंतर पुढील अन्वेषणासाठी किंवा खटला चालवण्यासाठी त्याला गुन्ह्याच्या मुख्य ठिकाणी (ज्या ठिकाणी गुन्हा घडला आहे) नेण्यासाठी पोलिसांना दिलेली अधिकृत अनुमती.)
हा प्रकार पालकांसाठी धोक्याची घंटा आहे. आपली मुले इंटरनेटवर काय पहातात ?, कुणाशी बोलतात ? आणि ‘ऑनलाईन गेम्स’च्या नावाखाली ते कोणत्या जाळ्यात अडकत नाही ना ?, याकडे बारीक लक्ष देणे काळाची आवश्यकता आहे. या प्रकरणाने डिजिटल सुरक्षेतील त्रुटी आणि तरुणांच्या मानसिकतेचा लाभ घेणार्या आतंकवादी संघटनांचे क्रूर वास्तव पुन्हा एकदा समोर आणले आहे. ‘बडा इम्रान’च्या अटकेनंतर या ऑनलाईन जाळ्याचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पसरले आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या तरी संपूर्ण राज्य आणि देशातील अन्वेषण यंत्रणा या ‘डिजिटल टेरर’चा (डिजिटल आतंकवाद) नायनाट करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.’
– संतोष वाघ
(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’)
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्ययात्रेत दिसले लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?