साधकाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन केल्यावर त्यांनी साधकाला सूक्ष्मातून केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘एकदा मी प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) आत्मनिवेदन केले. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी मला अंतर्मुख होता येण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मार्गदर्शन केले. ते मी गुरुचरणी अर्पण करत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मी : परम पूज्य, मला सर्व सुख-सुविधा असूनही मी नामस्मरण करण्यास अल्प पडतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : श्रीकृष्णाचा भक्त सुदामा याच्याकडे तर काहीच नव्हते, तरीही त्याने श्रीकृष्णाचे नामस्मरण करणे सोडले नाही; मात्र आपल्याकडे सर्वकाही असूनही आपण नामस्मरण आणि साधना मनापासून करत नाही.

श्री. विठ्ठल कदम

मी : त्याची मनाला जाणीव आहे; पण प्रयत्न होत नाहीत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मनाला जाणीव होणे, हा एक टप्पा आहे आणि जाणीव होऊन कृतीच्या स्तरावर प्रयत्न करणे, म्हणजेच खरी साधना करायला आरंभ झाला आहे.

मी : ‘रामनाथी आश्रम, म्हणजे वैकुंठ आहे’, असा भाव ठेवतो; पण त्यानुसार माझ्याकडून प्रयत्न होत नाहीत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘रामनाथी आश्रम, म्हणजे ‘वैकुंठ’ असा तुमचा जरी भाव असला, तरीही ‘वैकुंठात आनंदी रहाता येण्यासाठी कुठे अल्प पडता ?’, याचे चिंतन करा.

मी : जीवनात काहीही नसले, तरीही चालेल; पण ‘गुरु असणे’ पुष्कळ महत्त्वाचे वाटते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : गुरु जीवनात आले आहेत; पण गुरुप्राप्तीसाठी प्रयत्न होत नाहीत. यापेक्षा दुसरे दुःख नाही.

हे गुरुमाऊली, मनाला अंतर्मुख करण्यासाठी आपण मला जे मार्गदर्शन केले, त्यानुसार माझ्याकडून प्रयत्न होऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विठ्ठल कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक