CM Chandrababu Naidu : आंध्रप्रदेशात चौथे मूल जन्माला घालणार्‍या दांपत्यांना मिळणार ४० सहस्र रुपये

राज्याच्या घटत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची घोषणा

श्रीकाकुलम् (आंध्रप्रदेश) – राज्याला आता लोकसंख्या अल्प होण्याची चिंता सतावू लागली आहे. मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी तिसरे मूल जन्माला घालणार्‍या दांपत्याला सहस्र रुपये, तर चौथे मूल जन्माला घालणार्‍या दांपत्याला ४० सहस्र रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. श्रीकाकुलम् जिल्ह्यातील नरसन्नापेटा येथे ‘स्वर्ण आंध्र-स्वच्छ आंध्र’ कार्यक्रमाला संबोधित करतांना त्यांनी ही घोषणा केली. दुसरे अपत्य झाल्यावर २५ सहस्र रुपये देण्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच विधानसभेत केली होती.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू पुढे म्हणाले की, लोकसंख्या हीच भविष्यातील खरी संपत्ती आहे. हे प्रोत्साहन नवीन लोकसंख्या व्यवस्थापन धोरणाचा एक भाग आहे. या धोरणाचा उद्देश लोकसंख्या वाढीला चालना देणे हा आहे; कारण राज्याचा विकास केवळ मानवी संसाधनांमुळेच शक्य आहे.

संपादकीय भूमिका

  • याचा लाभ हिंदु पालक किती घेतील आणि मुसलमान किती घेतील, हा संशोधनाचा विषय आहे !
  • केवळ मुले जन्माला घालून समस्या सुटत नसतात, तर जन्माला घातलेल्या मुलांवर धर्माचरण आणि राष्ट्राभिमान यांचे संस्कार केल्यास सर्व समस्यांचे निवारण होऊ शकते, हे राज्यकर्त्यांना कळेल, तो सुदिन !