Australia Indian-Origin Jailed : ऑस्ट्रेलियात भारत वंशाच्या वासनांधाला १३ वर्षांचा कारावास

६१ महिलांचे केले होते लैंगिक शोषण

भारतीय वंशाचा कथित मसाज थेरपिस्ट सुमित सतीश रस्तोगी याला महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात सुनावली कारावासाची शिक्षा

कॅनबेरा (ऑस्टेलिया) – ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय वंशाचा कथित मसाज थेरपिस्ट (मालीश करण्याचा व्यवसाय असणारा) सुमित सतीश रस्तोगी याला ६१ महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात न्यायालयाने १३ वर्षे १० महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने म्हटले, ‘शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियातून हद्दपार केले जाऊ शकते.’ सुमित याने न्यायालयात ९७ आरोप स्वीकारले, ज्यात महिलांचे गुप्त व्हिडिओ बनवणे आणि लैंगिक शोषण यांचा समावेश आहे. त्याने ऑक्टोबर २०२१ ते जुलै २०२२ या काळात एका मसाज पार्लरमध्ये महिलांची छेड काढली होती. सुमितकडे मसाज थेरपीची कोणतीही अधिकृत पात्रता नव्हती, असेही चौकशीत समोर आले होते.

न्यायाधिशांनी सांगितले की, महिला उपचारासाठी आणि आरामासाठी त्याच्याकडे आल्या होत्या; परंतु त्याने त्यांच्या विश्वासाचा अपलाभ घेतला.

संपादकीय भूमिका

अशांनी शिक्षा भोगल्यावर त्यांची भारतात हकालपट्टी केल्यावर त्यांना भारत परत घेऊ नये, असेच जनतेला वाटेल !