मुंबापुरीत घुमणार वेदमंत्रांचा जयघोष !
मुंबई, १६ मे (वार्ता.) – तपोभूमी भारताला सध्याच्या युद्धकाळात संरक्षणकवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने श्री राजमातंगी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ मे या दिवशी प्रभादेवी येथील नर्दुल्ला टँक मैदानात दुपारी ३ ते सायंकाळी ७.३० या वेळेत हा चैतन्यमय महायज्ञ होणार आहे.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या दिव्य उपस्थितीत होणार्या या महायज्ञाचा लाभ सहस्रो देवीभक्त घेणार आहेत.
🕉️ Mumbai to Witness the Divine Power of the ‘Shri Rajmatangi Mahayagna’ on May 17th for National Progress, Protection & Prosperity – @1chetanrajhans National Spokesperson, @SanatanSanstha
🌟 Biggest Attraction of the Mahayagna:
Devotees will get the rare opportunity to have… pic.twitter.com/TLWcaZwtvl— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 16, 2026
राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबई आणि परिसरातील अनेक नेते अन् मान्यवर यांना या महायज्ञाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
या महायज्ञाचे पौरोहित्य इरोड, तमिळनाडू येथील शिवागम् विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती आणि शिवाचार्य श्री. गुरुमूर्ती हे करणार आहेत.
महायज्ञाचे हे असणार सर्वांत मोठे आकर्षण !
महायज्ञाचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे १ सहस्र वर्षांपूर्वी आक्रमणकर्ता महंमद गझनीने भग्न केलेल्या सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे दर्शन ! इतिहासाची साक्ष देणारे हे पवित्र अवशेष यज्ञस्थळी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. भाविक याचा लाभ घेऊ शकतात. यासह सनातन संस्थेचे ग्रंथ, पूजनोपयोगी आणि नित्योपयोगी उत्पादने यांचेही प्रदर्शन या ठिकाणी असणार आहे. |
घरबसल्या अनुभवा श्री राजमातंगी महायज्ञाचे चैतन्य !

श्री राजमातंगी महायज्ञाचे थेट प्रसारण पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !
♦ SanatanRashtraShankhnad.in/events/shri-rajamatangi-mahayajna
असा होईल महायज्ञ !
|


गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक